विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. कोहली आणि रोहितने टीम इंडियासाठी मोलाची कामगिरी केली आहे. रोहित आणि कोहलीच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला. कोहलीने अनेक टी20 आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत, जे कोणत्याही खेळाडूला तोडणे सोपे नाही. मात्र, आता दोघांनाही संस्मरणीय निरोप मिळाला आहे.
टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. मात्र आता रोहित शर्माने पुन्हा एकदा चाहत्यांचे स्वप्न सत्यात उतरवले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्यावेळी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, यावेळी रोहितने चाहत्यांना निराश न करता संघाला चॅम्पियन बनवले.
It’s your Captain Rohit Sharma signing off from T20Is after the #T20WorldCup triumph! 🏆
He retires from the T20I cricket on a very special note! 🙌 🙌
Thank you, Captain! 🫡#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/NF0tJB6kO1
— BCCI (@BCCI) June 29, 2024
विराट हा जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. कोहलीच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो शानदार आहे. त्याने 125 सामन्यात 4188 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 38 अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 122 आहे. कोहली टीम इंडियासाठी विश्वासार्ह आहे. मात्र, हा टी20 विश्वचषक त्याच्यासाठी चांगला नव्हता. पण त्याने अंतिम फेरीत 76 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
रोहितबद्दल बोलायचे झाले तर तो एक मजबूत खेळाडू म्हणून उदयास आला आणि यानंतर तो एक यशस्वी कर्णधार म्हणूनही सिद्ध झाला. रोहित त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तो परिस्थितीनुसार खेळतो. पण बहुतेक वेळा तो हल्ला करण्याच्या दृष्टीकोनातून दिसला. रोहितने भारताकडून 159 टी20 सामने खेळले. या दरम्यान 4231 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने 5 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 121 धावा. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्याची फलंदाजीही कठीण परिस्थितीत भारताला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“बर्थडे गिफ्टसाठी धन्यवाद..” टी20 विश्वचषक विजयानंतर धोनीची प्रतिक्रिया, टीम इंडियाचे हटके शैलीत अभिनंदन
“मागील काही दिवसांत मी…” टी20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याने उघड केल्या वेदना
धक्कादायक…! विराट पाठोपाठ रोहित शर्माची देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती