---Advertisement---

यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव

On: रविवार, जून 2, 2024 10:59 AM
USA VS Canada
---Advertisement---

आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आहे. यजमान संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि  तो निर्णय संघासाठी महत्वाचा ठरला. अमेरिकेने 194 धावांचा पाठलाग करताना सामन्यावर एकतर्फी विजय मिळवला.

तत्पूर्वी कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना नवनीत धालीवालने 44 चेंडूत 61 धावा तर निकोलस किर्टनने 31 चेंडूत 51 धावा दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कॅनडाने 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 194 धावांचा लक्ष्य अमेरिकेसमोर ठेवला. अमेरिकेकडून गोलंदाजीत अली खान, कोरी अँडरसन आणि हर्मित सिंगनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

धावांचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात निराशाजनक झाली. सालामीवीर स्टीवन टेलरला कलीम सनाने शून्यवर तंबूत पाठवला तर कर्णधार मोनांक पटेलही 16 धावांवर स्वस्तात बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या एंड्रीस गाैस आणि ॲरन जोन्सनी संघासाठी 131 धावांची विस्फोटक अभेद्य भागीदारी करत विजय खेचून आणला. ॲरन जोन्सनी केवळ 40 चेंडूत 94 धावांची खेळी केली ज्यामध्ये 4 चाैकार तर 10 षटकांराची समावेळ होता. तर एंड्रीस गाैसनं 46 चेंडूत 65 धावा करत ॲरन जोन्सला चांगली साथ दिली. गोलंदाजीत डिलन हेलीगर निखिल दूत्ता आणि कलीम सनाने कॅनडीसाठी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतले. एंड्रीस गाैसचा निखिल दूत्ताने 65 धावांवर विकेट घेतला पण तोपर्यंत सामना अमेरिकेच्या पारड्यात झुकला होता.

ॲरन जोन्सच्या आक्रमक खेळीने अमेरिकेने स्पर्धेतील पहिला सामना आपल्या नावे केला आहे. 17.4 षटकात अमेरिकेने सामन्यावर विजय मिळवला. आपल्या विस्फोटक खेळीसाठी ॲरन जोन्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेच्या फलंदाजांसमोर कॅनडाच्या गोलंदाजांनी गुडघे टेकल्याच्या दिसून आले. विश्वचषकातील हा पहिला सामना ग्रँँड प्रेअरी स्टेडीयम येथे खेळला गेला हेता.

महत्तवाच्या बातम्या-

हार्दिक पांड्यानं मारलेला चेंडू थेट हातावर येऊन लागला! बांगलादेशच्या गोलंदाजाला जबर दुखापत
विराट सारखं दुसरं कोणीच नाही! टी20 विश्वचषकापूर्वी आयसीसीकडून मिळाला आणखी एक पुरस्कार
अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझी फॅन फॉलोइंग! भेट घेण्यासाठी चाहता थेट घुसला मैदानात; पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---