---Advertisement---

राहुल द्रविडला या आयपीएल संघाकडून मोठी ऑफर, ‘द वाॅल’ दिसणार नव्या भूमिकेत?

Rahul Dravid Ipl Coach
---Advertisement---

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. यंदाच्या टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर तो विनोदी स्वरात म्हणाला होता की आता तो बेरोजगार राहणार आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. एका वृत्तानुसार कोलकाता नाईट रायडर्सने द्रविडशी संपर्क साधला आहे. केकेआरला द्रविडला मेंटरचे पद द्यायचे आहे. गौतम गंभीरबद्दल चर्चा आहे की तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. त्यामुळे त्याची जागा रिक्त होणार आहे.

न्यूज18 बांग्ला मधील एका बातमीनुसार, कोलकाता नाइट रायडर्स संघाने द्रविडशी संपर्क साधला आहे. केकेआरला द्रविडला मेंटर बनवायचे आहे. वास्तविक, गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्याची बातमी आहे. जर गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला तर त्याची केकेआरमधील जागा रिक्त होईल. त्यामुळे त्याच्या जागी केकेआरला संघात अनुभवी खेळाडूचा समावेश करायला आवडेल. त्यामुळे केकेआर द्रविडला मेंटर बनवू शकते.

टीम इंडियाने राहुल द्रविडच्या कोचिंगखाली टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. भारतीय संघ यापूर्वी 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. फायलनमध्ये संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी त्याने सर्व सामने जिंकले असले तरी. द्रविडला कोचिंगचा खूप अनुभव आहे. जर तो केकेआरमध्ये सामील झाला तर खेळाडूंना त्याचा खूप फायदा होऊ शकतो.

गंभीरच्या पुनरागमनानंतर केकेआरची कामगिरी चांगली झाली. संघाने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. कोलकाताने फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. श्रेयस अय्यरचा कर्णधार असलेला केकेआर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. त्याने 14 साखळी सामने खेळले. या कालावधीत केकेआरने 9 सामने जिंकले तर 3 सामने हरले. आता गंभीर केकेआरला अलविदा करणार आहे. द्रविडला त्याची जागा मिळू शकते. द्रविड केकेआरमध्ये सामील झाल्यास त्याला पगार म्हणून मोठी रक्कम मिळू शकते.

महत्तवाच्या बातम्या-

आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा, भारताच्या ‘या’ खेळाडूनं मारली बाजी
विजयानंतरही वाढली गिलची डोकेदुखी, संघात तीन खेळाडू दाखल, यांचा प्लेइंग इलेव्हनमधून होणार पत्ता कट
विराट कोहलीचं स्वप्नातील घर पाहिलं का? उत्कृष्ट इंटीरियर, सुंदर लोकेशन; किती आहे किंमत?

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---