पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी 20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघास आपल्या पहिल्याच सामन्यात अमेरिका विरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले आहे. या सोबतच कर्णधार बाबर आझमवर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. ज्याला तो कधीही आठवणीत ठेवू शकणार नाही. आयर्लंड, अमेरिका, अफगाणिस्तान, आणि झिमबाब्वे संघा विरुद्ध हरणारा, तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे.
सामन्या बद्दल बोलायचे झाले तर यजमानांनी टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सिरुवात खूपच वाईट झाली. पहिल्या पावरप्ले मध्ये 3 विकेट्स गमावल्या. कर्णधार बाबर आझम आणि शादाब खान संघाला सावरत 72 धांवाची भागीदारी केली. व सन्मानजनक धावसंख्या पर्यंत संघाला पोहचवले, पाकिस्तानने अमेरिकेसमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने सावध सुरुवात केली. पण 5.1 षटकात स्टीव टेलर बाद झाला. कर्णधार मोनांक पटेल अँड्रिस गॉस दोघांनी निर्णायक 68 धावांची भारीदारी केली. त्यानंतर आरोन जोन्स नितीश कुमार दोघांच्या अंतीम षटकांत जोरदार फटकेबाजीच्या जोरावर संघाने सामना टाय केला. पुढे जाऊन सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकून इतिहास रचला.
या पराभवानंतर बाबर आझमच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. त्याच्या नावे आयर्लंड, अमेरिका, अफगाणिस्तान, आणि झिमबाब्वे संघा विरुद्ध हरणार तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे. बाबर आझमच्या कर्णधार पदात 2022 साली पाकिस्तान संघाने 1 धावानी झिमबाब्वे सामना गमावला होता. तर 2023 च्या एकदिवसीट विश्वचषकात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा सहज पराभव केला होता. तर टी20 विश्वचषकापूर्वी आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानचा पराभव झाला होता. आणि काल अमेरिके विरुद्ध लाजीरवाणा पराभव झाला.
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार मोनांक पटेलनं दिली प्रतिक्रिया
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 5 सर्वात मोठे अपसेट, अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही समावेश
पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडिया सावध! रोहित सेना चुकूनही करणार नाही ‘या’ चार गोष्टी