---Advertisement---

षटकार किंग युवराज सिंगलाही घाम फोडणाऱ्या गोलंदाजाने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

---Advertisement---

लाहोर | पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल हा शुक्रवारी (16 ऑक्टोबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला. पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय टी20 स्पर्धेत गूल बलुचिस्तान संघाकडून खेळत होता. या सामन्यात संघाचा पराभव झाल्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शुक्रवारी त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला.

पेशावर येथील रहिवासी असलेल्या उमर गुलने 2003 मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2002 मधील 19 वर्षाखालील विश्वचषकात गुलची पहिल्यांदाच जगाला ओळख झाली होती. 36 वर्षीय गुल पाकिस्तानकडून 47 कसोटी, 130 वनडे आणि 60 टी20 सामने खेळला.

मैदानातच भावुक झाला गुल
जवळपास 20 वर्षे क्रिकेट खेळणारा गुल निवृत्तीची घोषणा करताना अत्यंत भावूक झाला. आपल्या कुटूंबाचे, मित्रांचे आणि प्रशिक्षकाचे आभार मानून तो रडू लागला. यावेळी तो म्हणाला की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मला देशाकडून खेळण्याची संधी मिळाली.”

https://twitter.com/ICC/status/1317375264184295424

2003 मध्ये मिळाली होती संधी
2003 च्या विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर उमर गुलला प्रथमच संघात संधी मिळाली. तेव्हा वसीम अक्रम आणि वकार युनिस या दिग्गज गोलंदाजांचा काळ हळू हळू संपत होता. क्रिकेटच्या सर्व प्रकारात गुलने एकूण 987 बळी घेतले आहेत. उमर गुल यॉर्कर चेंडू टाकण्यात तज्ञ होता. त्या दिवसांत गुलने आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाज युवराज सिंगला खूप त्रास दिला होता. हे दोघेही कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यात 22 वेळा आमने सामने आले. त्यामध्ये त्याने युवराजला 6 वेळा बाद केले होते.

आयसीसी क्रमवारीत होता प्रथम क्रमांक
2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये उमर गुलने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानकडून सर्वाधिक बळी घेतले होते. याशिवाय गुलने 2009 मध्ये पाकिस्तानला टी20 चॅम्पियन बनवण्यात मोलाची कामगिरी निभावली होती. या स्पर्धेतही गुलने आपल्या संघाकडून सर्वाधिक बळी घेतले होते. गुल दीर्घकाळ आयसीसी टी20 क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहिला होता. 2007 च्या टी20 विश्वचषकात गुलने न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या 6 धावा देऊन 5 बळी घेतले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-युवराज सिंग करणार आयपीएलमध्ये पुनरागमन?, कारणही आहे तसंच

-ज्युनीयर युवराज सिंग अशी ओळख असलेला खेळाडू आयपीएलमध्ये होणार कर्णधार?

-ना भाई ना! तेवतियाच्या एका षटकातील ५ षटकारांनंतर युवराज सिंगने केले खास ट्विट

-पाकिस्तानकडून ४०० विकेट्स घेणारा गोलंदाज होणार निवृत्त, आता ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून

-अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू

-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---