Loading...

…तर चाहत्यांनी स्टेडियममध्ये धोनी-धोनी ओरडू नये – विराट कोहली

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. परंतु, शुक्रवारी (6 डिसेंबर) हैदराबाद (Hyderabad) येथे होणाऱ्या भारत विरुद्ध विंडीजच्या (India vs Windies)  टी20 सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पंतचे समर्थन केले आहे.

Loading...

गुरुवारी (5 डिसेंबर) विराट कोहली (Virat Kohli) पंतचे समर्थन (Support) करताना म्हणाला की, आम्ही पंतला एकटे वाटू देणार नाही.

पंतला मागील अनेक सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे आणि यष्टीरक्षण करताना त्याच्याकडून झालेल्या चूकांमुळे त्याला जोरदार टीकांचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच डीआरएसच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला लक्ष्य केले गेले होते.

“रिषभच्या क्षमतेवर आम्हाला नक्कीच विश्वास आहे. पण मला वाटते की त्या खेळाडूला चांगली कामगिरी करण्यास थोडी वेळ देणे ही आजूबाजूच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर त्याने संधी गमावली तर लोक स्टेडियममध्ये एमएस धोनीच्या नाव घेऊन ओरडू शकत नाहीत. हे आदरणीय नाही. कारण कोणत्याही खेळाडूला असे झालेले आवडणार नाही,” असे कोहली म्हणाला.

Loading...

“आपण आपल्या स्वत: च्या देशात खेळत आहोत आणि हा माणूस काय चूक करेल असा नेहमी विचार करण्यापेक्षा त्याला आधार द्यायला पाहिजे,” असे कोहली पुढे म्हणाला.

“अलीकडेच रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटल्याप्रमाणे, त्याला एकटे सोडण्याची गरज आहे, तो सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. एकदा तो चांगल्या लयीत आला की तूम्ही त्याला चांगली कामगिरी करताना पहाल, जशी आयपीएलमध्ये पाहिली आहे. तिथे तो स्वतंत्र असतो,” असे कोहली म्हणाला.

“त्याला इतके एकटे सोडूनही चालणार नाही की तो मैदानात निराश होईल. आम्ही त्याच्या मदतीसाठी येथे आहोत,” असेही कोहली यावेळी म्हणाला.

Loading...

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर (3 Matches T20 Series) 15 डिसेंबरपासून 3 सामन्यांची वनडे (3 Matches ODI Series) मालिका खेळली जाणार आहे.

You might also like
Loading...