पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘मिरॅकल गर्ल’ म्हणून सिद्ध होत असलेली नेमबाज मनू भाकरने पदकांची हॅट्ट्रिक करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आणि 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनही पदकापासून एक विजय दूर आहे. आतापर्यंत दोन कांस्यपदके जिंकणाऱ्या मनू भाकरने सुरुवात केली आणि पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली. तर क्वाटर फायनलमध्ये एका गेमने पिछाडीवर पडल्यानंतर लक्ष्य सेनने शानदार पुनरागमन केले आणि बॅडमिंटनमध्ये भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.
लक्ष्य सेनने एक गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा रोमहर्षक सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम चारमध्ये पोहोचणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला. लक्ष्यने चेनचा 19-21, 21-15, 21-12 असा पराभव केला. पीव्ही सिंधू आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पराभव झाल्यानंतर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सर्वांच्या आशा लक्ष्यावर आहेत.
सायना नेहवालने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्य (2012), रौप्य (2016) आणि कांस्य (2020) पदके जिंकले आहेत. लक्ष्यचा सामना आता ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनशी होणार आहे. भारतासाठी, ऑलिम्पिक बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेत, पारुपल्ली कश्यपने 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि किदाम्बी श्रीकांतने 2016 रिओ ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी अभूतपूर्व तिसऱ्या पदकाच्या दिशेने वाटचाल करत मनू भाकर शुक्रवारी (02 ऑगस्ट) नेमबाजी 25 मीटर महिला पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली, परंतु ईशा सिंग स्पर्धेबाहेर पडली. पुरुषांच्या स्कीट पात्रतेच्या पहिल्या दिवशी खराब सुरुवातीनंतर अनंतजित सिंग नारुका 30 नेमबाजांमध्ये 26व्या क्रमांकावर आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सरबज्योत सिंगसह मनू भाकरने मिश्र सांघिक प्रकारातही कांस्यपदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. तिसऱ्यापदकासाठी अंतिम सामना आज (03 ऑगस्ट) मनू भाकरचा खेळवला जाणार आहे.
हेही वाचा-
रोहित शर्माने अर्धशतक झळकावून रचला इतिहास; या महान विक्रमात सचिन तेंडुलकरची बरोबरी!
हातातला सामना गमावला”, रोहित शर्मानं या खेळाडूवर फोडलं खापर, पाहा कर्णधार नेमकं काय म्हणाला?
“एक एकेला टीम इंडिया पर भारी”, श्रीलंकेच्या 21 वर्षाच्या गोलंदाजासमोर भारतीय संघ ढेर!