---Advertisement---

Video: लाईव्ह सामन्यात भिडले प्रतिस्पर्धी संघ अन् केली बेदम मारहाण, काहींनी तर बॅटने दिला चोप

On: बुधवार, जुलै 21, 2021 12:35 PM
---Advertisement---

आपण बर्‍याचदा म्हणतो की, क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. परंतु अनेकवेळा जेव्हा दोन संघ एकमेकांविरूद्ध खेळत असतात, तेव्हा मैदानात अनेक प्रकारचे वाद होत असताना आपण पाहिला आहे. मात्र हे वाद एका मर्यादेपर्यंत असेपर्यंत चांगले वाटते. पण या गोष्टी जेव्हा मर्यादेबाहेर जातात, तेव्हा खेळाडूंना आणि तेथील उपस्थित लोकांनाही हानी पोहचू शकते.

काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडली आहे. त्या घटनेने संपूर्ण क्रिकेटविश्वाला हादरवून टाकले आहे. रविवारी (१८ जुलै) मॅडस्टोनमधील मोट पार्क क्रिकेट क्लब येथे सामन्याच्या शेवटच्या क्षणी ही घटना घडली होती. त्यावेळी केंटमध्ये एक चॅरिटी सामना चालू होता आणि सामन्याच्या मध्येच दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मोठा वाद सुरू झाला. काही वेळातच दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना बॅटने बेदम मारायला सुरुवात केली.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली असून हा व्हिडिओ सध्या ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अगोदर काही खेळाडूंमध्ये वाद चालू असलेला दिसून येत आहे. त्यानंतर एक खेळाडू बॅट घेऊन पळत येतो आणि विरोधी संघाच्या खेळाडूला मारायला सुरुवात करतो. या खेळाडूंचे वाद सोडवण्यासाठी काही लोक मध्ये आले होते तरीही हे खेळाडू शांत झाले नाहीत. या खेळाडूंचे हे कृत्य सर्वच क्रिकेटविश्वाला लाजवेल असे होते. कोणताही क्रिकेटप्रेमी हा व्हिडिओ पाहून नाराज झाला असेल.

https://twitter.com/mscmedia2/status/1417426780890095621?s=20

ही क्रिकेट स्पर्धा सुरू करण्याचा मुख्य उद्देश ‘शेअर फॉर केअर’ यासाठी पैसे गोळा करणे असा होता. ज्या लोकांना पाकिस्तानमध्ये काही वैद्यकीय मदतीची गरज आहे, त्यांना या माध्यमातून मदत करणे हा त्याचा हेतू आहे. या घटनेमुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. या हाणामारीत काही खेळाडू जखमी देखील झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---