पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिसबाह उल हक हा पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेड संघाचा कोच होता. मात्र, आता इस्लामाबाद संघाने त्याला मोठा धक्का दिला आहे. इस्लामाबाद संघाने गुरुवारी (24 डिसेंबर) जाहीर केली मिसबाह उल हक सोबत कोच म्हणून असलेला करार पुढे वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे मिसबाह उल हकला मोठा धक्का बसला आहे.
इस्लामाबाद यूनायटेड संघाने दोनवेळा विजेतेपद पटकावले
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिसबाह उल हक हा इस्लामाबाद संघाचा भाग असताना, 2016 मध्ये या संघाने पाकिस्तान सुपर लीगचा पहिला हंगाम जिंकला होता. परंतु मिसबाह उल हक या संघाचा कर्णधार म्हणून भाग होता. तसेच इस्लामाबाद संघाने 2018 साली पीएसएलचा किताब जिंकला होता.
मिसबाह उल हकला 2019 साली कोच म्हणून नियुक्त केले
इस्लामाबाद संघाला मिसबाह उल हकने दोनवेळा विजेतेपद पटकावून दिले होते. त्यामुळे इस्लामाबाद संघाचा प्रशिक्षक म्हणून 2019 साली त्याची नियुक्ती करण्यात आली होती. दोन हंगाम संपताच मिसबाह उल हक सोबत असलेला प्रशिक्षक करार पुढे वाढवण्यात आला नाही. मिसबाहने कर्णधार म्हणून इस्लामाबाद संघाला 25 पैकी 15 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
#ISLU will not be renewing @captainmisbahpk’s already expired head coach contract given his commitments with the National team. We thank him for his great contribution to ISLU. We wish him the very best of luck with the 🇵🇰 National Team.
PR: https://t.co/Ql6N1ex8zt#UnitedWeWin pic.twitter.com/n4eOEDqZjY
— Islamabad United (@IsbUnited) December 24, 2020
मिसबाह उल हकचा करार संपुष्टात आला
मिसबाह उल हकने इस्लामाबाद संघासोबत असलेला करार संपुष्टात आल्यावर, या फ्रँचायझीचे आभार मानले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
एका चाहत्याने मिसबाह उल हकला ट्रोल करत म्हटले, “मिसबाहला संघातून काढून टाकण्यात आले आहे.” त्याचबरोबर तो हेही म्हणाला की, “मिसबाह कोणत्याही संघाला सांभाळण्यासाठी लायक नाही.” तसेच अनेकांनी त्याला असेही म्हटले आहे की पाकिस्तान संघाच्या राष्ट्रीय संघाला फलंदाजी प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे.
Kindly do something else now 👏 plzz apni ability or potential se ziyada cricket khel li, ab maaf krdo is awaam ko,, ye cricket hi aik aakhri entertainment reh gyie he,, us se b ab nafrat honay lagi he
— Abdullah Shaikh (@Abdullah842003) December 24, 2020
Sharam kr khoti ky bachy tujh unho ny nikala hai wo bhi kick mar ky agr tujh bezati mehsoos ho to Pakistan pr reham kr ky resign kr batting coach sy
— Khawaja Waleed Hamza (@Wal33dHamza02) December 24, 2020
Misbah is pakistan cricket's destroyer and old fashioned approach only care about hai place in the side and entire generation is now adopting his style. PCB is also blind on this.
— Zaheer Abbas (@izaheerabbas) December 24, 2020
Dear misbah also kindly resign as a Head coach from Pakistan International team so that Pakistan International team could increase their ranking
— Ali Daniyal (@Adaniyal6666) December 24, 2020
मिसबाह उल हकची कामगिरी
मिसबाह उल हकने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 75 कसोटी, 162 वनडे आणि 39 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 5222, वनडेत 5122 आणि टी-20 मध्ये 788 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेट खेळताना त्याने 10 शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आम्ही कृष्णवर्णीय लोकांविषयी…’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा खळबळजनक खुलासा
मोठी बातमी! आयपीएल २०२२ मध्ये दोन नवे संघ होणार सामील, बीसीसीआयने दिली माहिती