---Advertisement---

रणजी ट्रॉफीच्या २०१९-२० हंगामातील तिसरी हॅट्रिक घेतली भारताकडून खेळलेल्या या गोलंदाजाने…

---Advertisement---

4 ते 5 फेब्रुवारी या दरम्यान पटियाला (Patiala) येथे रणजी ट्राॅफी (Ranji Trophy) स्पर्धेतील आठव्या फेरीत पंजाब विरुद्ध आंध्रप्रदेश (Punjab vs Andhra Pradesh) संघात सामना पार पडला. हा सामना पंजाबने 4 विकेट्सने (Won By 4 Wickets) जिंकला आहे. भारतीय संघात 2018 मध्ये वनडे पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने (Siddarth Kaul) या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे.

पंजाबकडून खेळणाऱ्या कौलने या सामन्यातील पहिल्या डावात पाच विकेट्स घेतले होते. यामध्ये हॅट्रिकचा समावेश आहे. कौलबरोबरच पंजाबकडून पहिल्या डावात विनय चौधरीने (Vinay Choudhary) 3 आणि कृषण अलंगने (Krishan Alang) 2 विकेट्स घेतल्या.

पंजाबकडून कौलने पहिल्या डावात 40व्या षटकात हॅट्रिक घेतली. कौलने या षटकातील दुसऱ्या चेंडूवर के. व्ही. शशिकांत (KV Sasikanth), तिसऱ्या चेंडूवर दसारी स्वरूप (Dasari Swaroop) आणि चौथ्या चेंडूवर एस आशिषला (S Ashish) बाद केले आणि त्याची हॅट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्स त्याने फलंदाजांना त्रिफळाचीत करत घेतल्या.

पंजाबच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंध्रप्रदेशच्या संघाचा पहिला डाव 39.4 षटकात सर्वबाद 97 धावांवर संपुष्टात आला.

कौलने घेतलेल्या हॅट्रिकचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://twitter.com/BCCIdomestic/status/1224684470025850881

यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पंजाबने पहिल्या डावात 108 धावा करत 11 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आंध्रप्रदेशचा दुसरा डाव सर्वबाद 134 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पंजाबला सामना जिंकण्यासाठी 124 धावांचे लक्ष्य मिळाले.

या लक्ष्य पंजाबने 39 षटकात 6 बाद 129 धावा करत सहज गाठले. त्यामुळे पंजाबने हा सामना 4 विकेट्सने जिंकला.

हॅट्रिक घेणाऱ्या सिद्धार्थची अशी आहे कामगिरी – 

सिद्धार्थ कौलने आतापर्यंत 62 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 25.69 च्या सरासरीने 230 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 90 ‘अ’ दर्जाचे सामने आणि 104 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये प्रत्येकी 155 आणि 114 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच तो भारताकडून 3 वनडे सामने खेळला आहे. मात्र त्याला भारताकडून विकेट घेण्यात अपयश आले आहे.

त्याचबरोबर कौल आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स (Delhi Daredevils), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या संघाचा भाग होता.

रणजी ट्रॉफीत 2019-20 या हंगामात घेतलेल्या हॅट्रिक (गोलंदाज)-

शाहबाज अहमद (वि. हैदराबाद)

रवी यादव (वि.मध्यप्रदेश)

सिद्धार्थ कौल (वि. आंध्रप्रदेश)

https://twitter.com/Maha_Sports/status/1225063611149643776

https://twitter.com/Maha_Sports/status/1225052083998482432

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---