भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सांगितला. ऋषभ पंत नुकताच शिखर धवनच्या ‘धवन करेंगे’ या नवीन शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी पंतने कार अपघातानंतर झालेल्या असह्य वेदनांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
2022 मध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्याच्या शरीराला अनेक ठिकाणी इजा झाली होती, तसेच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. या अपघातामुळे रिषभ पंतची कारकीर्द धोक्यात आली होती, परंतू रिषभ पंतने या सर्व परिस्थितीवर धैर्याने मात केली. तब्बल 15 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्याने यंदा आयपीएल 2024 मध्ये धडाक्यात पुनरागमन केले. त्याचा फॉर्म इतका दर्जेदार होता की टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडणाऱ्या समितीचे त्याने लक्ष वेधून घेतले. अखेर त्याचा टी20 संघात समावेश झाला आणि तो आता युएसएला पोहोचला आहे.
तो पुढे म्हणाला, “मी दोन महिने दातही घासले नाहीत. सुमारे सहा ते सात महिने मला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. मला विमानतळावर जायचे नव्हते कारण मला व्हीलचेअरवर बसून लोकांचा सामना करायला संकोच वाटत होता. आता मी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्याने मला दडपणापेक्षा जास्त उत्साह वाटतो आहे.”
ऋषभ पंतने आयपीएल 2024 मध्ये जोरदार कमबॅक केला आहे. या मोसमात त्याने 155.40 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 13 सामन्यात 446 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन अर्धशतकी खेळीचां समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबर पासून सुरुवात
MPL 2024च्या दुसऱ्या हंगामासाठी रत्नागिरी जेट्सच्या नव्या कोऱ्या जर्सीचे अनावरण
मोठी बातमी ! फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेतून राफेल नदाल ‘आऊट’, पहिल्याच फेरीत चॅम्पियन ‘राफा’ पराभूत । French Open 2024