---Advertisement---

कट्टर फुटबॉलप्रेमी असलेल्या ‘या’ शहरात आता उभारले जाणार क्रिकेट स्टेडियम

On: रविवार, मे 23, 2021 11:02 PM
---Advertisement---

स्पेन मधील बार्सिलोना हे शहर फुटबॉल साठी प्रसिद्ध आहे. स्पॅनिश फुटबाॅल लीग मधील बार्सिलोना हा क्लब जगातील सगळ्यात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे. लोकप्रिय फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच क्लबचे प्रतिनिधीत्व करतो.  मात्र आता या फुटबॉल प्रेमी शहरात एक क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. फुटबॉलच्या तुलनेत क्रिकेटची लोकप्रियता इथे बरीच कमी आहे. मात्र तरीही इथे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी लोकांनी मतदान केले आहे. या मतदानामुळे बार्सिलोनाचे अधिकारी देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

‘द गार्जियन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बार्सिलोनाने आपल्या नागरिकांसाठी ३० मिलियन युरोंचे पॅकेज जाहीर केले होते. ज्याच्या अंतर्गत सायकलिंग लेनसह खेळांची मैदाने बांधण्याच्या योजनांचा समावेश होता. यावर नागरिकांना मतदान करण्यासाठी सांगण्यात आले होते, ज्यात सर्वाधिक नागरिकांनी क्रिकेट मैदान बांधण्यासाठी आपली पसंती दर्शवली.

या वृत्तानुसार हा निर्णय युवा महिलांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात येणार्‍या अभियानामुळे शक्य झाले आहे. २० वर्षीय हिफ्सा बट हिने दिलेल्या माहितीच्या आधारे या वृत्तात म्हंटले आहे की क्रिकेटची सुरुवात २०१८ साली या शहरात झाली होती. त्यावेळी एका जिम प्रशिक्षकाने शाळा संपल्यानंतर क्रिकेट क्लब सुरू होत असल्याची घोषणा केली होती. सुरुवातीला जेव्हा क्लबची घोषणा झाली त्यावेळी तेथील पाकिस्तानी आणि भारतीय परिवारातील महिलांना याबाबत फार माहिती नव्हती. स्पेनच्या जिम प्रशिक्षकांना देखील माहिती नव्हती. त्यांचा प्रशिक्षक एक लॅटिन अमेरिकन रग्बी खेळाडू होता.

मात्र त्यानंतर महिलांनी या खेळात रस दाखवायला सुरुवात केली. या प्रशिक्षणामुळे त्यांच्यात सशक्त होत असल्याची भावना निर्माण झाली. आपले कौशल्य आपण स्वतंत्रपणे विकसित करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला, असे मत हिफ्सा बट हिने व्यक्त केले. आता महिलांचा स्वतंत्र संघ येत्या काळात तयार करण्याची त्यांची योजना आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अजबच! शोएब मलिकने चौकार तर आडवला, पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाज धावले ५ धावा, पाहा गमतीशीर व्हिडिओ

आशिया कप पुन्हा झाला स्थगित, आता ‘या’ साली होणार स्पर्धा

या ५ भारतीय क्रिकेटपटूंनी केले आहे चित्रपटांमध्ये काम; एका विश्वचषकविजेत्या कर्णधाराचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---