भारतीय क्रिकेट चाहते भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तसेच भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनही या पाच सामनांच्या कसोटी मालिकेत आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे.
आयसीसीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये आर. आश्विनने इंग्लंडमधील कसोटी मालिकेविषयी त्याचे मत व्यक्त करत भारतासाठी चांगली कामगिरी करण्याची इच्छा व्यक्त केली.
“मला कायमच इंग्लंडमध्ये खेळायला आवडते. मला आणि भारतीय संघाला इंग्लंडमधील परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम आहे. मात्र आम्हाला इथल्या परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घ्यावे लागेल.” अश्विन इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेबद्दल बोलताना म्हणाला.
“भारतीय संघाची या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी होण्यासाठी मी माझा अनुभव पणाला लावणार आहे. मी या दौऱ्यासाठी चांगली तयारी केली आहे. तसेच इंग्लंडमधील आव्हानांचा सामना करण्यासाठी मी तयार आहे.” असे आर.अश्विन म्हणाला.
भारताच्या इंग्लड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होत आहे.
यापूर्वी या इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारताने २-१ विजय मिळवला आहे. तर एकदिवसीय मालिकेत इंग्लंड २-१ ने विजयी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जुन तेंडुलकरची सुटका नाही, नेटकऱ्यांनी धरले पुन्हा एकदा धारेवर
-श्रीलंकेत असा पराक्रम करणारा केशव महाराज ठरला पहिला विदेशी गोलंदाज