---Advertisement---

श्रीलंका ‘सुपर १२’मध्ये जाणार का? पाहा काय आहेत समीकरणं

sri lanka
---Advertisement---

मंगळवारी (18 ऑक्टोबर) आयसीसी टी-20 विश्वचषकात श्रीलंकन संघाने चांगले पुनरागमन केले. या सामन्यात यूएईविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर श्रीलंकन संघाच्या सुपर 12 फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. उभय संघांतील हा सामना गीलॉंगमध्ये खेळला गेला, जो श्रीलंकेने 79 धावांच्या अंतराने नावावर केला. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. गोलंदाजांच्या या प्रदर्शनाचा फायदा संघाला पुढच्या सामन्यांमध्ये नक्कीच होईल. 

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चा पहिलाच सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात श्रीलंकन संघ 55 धावांनी पराभूत झाला. या पराभवानंतर संघ सुपर 12 फेरीत पोहोचेल की नाही, याविषयी शंका उपस्थित झाली होती. पण संघाने यूएईविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवला आणि सुपर 12 च्या शर्यतीत कायम असल्याचेही स्पष्ट केले. लीग स्टेजमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन ग्रुपमध्ये सामने खेळले जात आहे. श्रीलंका ग्रुप ए मध्ये असून त्यांच्यासोबत नामिबिया, यूएई आणि नेदरलंड संघ आहेत. आता या चारही संघांना लीग स्टेजचा शेवटचा सामना गुरुवारी (20 ऑक्टोबर) खेळायचा आहे. या सामन्यांनंतर सुपर 12 मध्ये कोणते दोन संघ जागा मिळवणार, हे स्पष्ट होईल.

श्रीलंका ग्रुप ए मध्ये सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेदर्लंडने लीग स्टेजचे पहिले दोन्ही सामने जिंकून या चौघांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. श्रीलंका आणि नामिबिया सध्या अनुक्रमे तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांनी पहिल्या दोन सामन्यांपैकी एकात विजय आणि एकात पराभव स्वीकारला आहे. पण नामिबिया नेट रन-रेटच्या जोरावर श्रीलंकेपेक्षा पुढे आहे. गुरुवारी श्रीलंका आणि नेदर्लंड संघ आमने सामने असतील. या सामन्यात जर श्रीलंकने विजय मिळवला तर संघ सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरू शकतो. पण या सामन्यात श्रीलंकन संघ पराभूत झाला तर, यूएईने नामिबियाला पराभूत करणे, ही त्यांची गरज असेल. असे झाले तरच तिन्ही संघ गुणतालिकेत बरोबरीवर येतील.

श्रीलंकन संघाविरुद्ध जर नेदरलंडने अंदाजे 150 धावांचे लक्ष्य उभे केले आणि श्रीलंका यात 20 धावांनी पराभूत झाला, तर नामिबिया देखील यूएईविरुद्ध 47 धावांनी पराभूत झाला पाहिजे. तेव्हा कुठे श्रीलंकन संघ सुपर 12 साठी पात्र ठरू शकतो. सध्या नामिबिया नेट रन रेटच्या बाबतीत नामिबिया सध्या श्रीलंकेच्या पुढे आहे. पहिल्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांना जबरदस्त प्रदर्शन केल्यामुळे नामिबियाचे नेट रन रेट चांगले श्रीलंकेच्या तुलनेत चांगले आहे. श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात जरी चांगली गोलंदाजी केली असली, तरीही त्यांना सुपर 12 मध्ये पोहोचण्यासाठी अजून खूप आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चक्क WWE सुपरस्टार ‘द रॉक’ पाहतोय भारत-पाक सामन्याची वाट! बघा काय म्हणतोय
श्रीलंकेने आव्हान राखलं! दणदणीत विजयासह मुख्य फेरीच्या आशा कायम 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---