---Advertisement---

पाकिस्तान सावध राहा! अमेरिकेचा वादळ येणार, कर्णधार मोनांक पटेलने दिला इशारा

On: गुरूवार, जून 6, 2024 2:49 PM
USA MONANK PATEL VS PAK BABAR AZAM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मध्ये आज (6 जून) पाकिस्तान आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान स्परेधेचा पहिला सामना अमेरिका विरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघामधील हा सामना ग्रँड प्रेरी स्टेडियम येथे होणार आहे. पण या सामन्या अगोदर अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने मोठे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे.

अमेरिका आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. अमेरिकन संघाने कॅनडाविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. अशा स्थितीत अमेरिकेचा आत्मविश्वास उंचावला आहे. या अतिआत्मविश्वासामुळे अमेरिकन कर्णधाराने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले होते की, एकदा आम्ही पाकिस्तानविरुद्धच्या मैदानावर 30-40 मिनिटे घालवली की मग आम्ही सामना त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकतो.

पत्रकार परिषदेत, अमेरिकन कर्णधार म्हणाला, “आम्ही पाकिस्तानवर लक्ष केंद्रित करणार नाही. आम्ही आमच्या क्रिकेटवर ध्यान देणार आहे. आम्ही हे सुनिश्चित करु इच्छितो की आम्ही जसे आधी खेळत आलो आहोत तसे आता खेळत राहू. तुम्हाला माहिती आहे, हा टी-20 आहे. एकदा तुम्ही मैदानावर 30-40 मिनिटे घालवली की तुम्हाला कळत नाही. सामना हातातून निघून जाईल.” यासोबतच कर्णधार बाबर आझमची स्तुती करत तो म्हणाला , बाबर क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅट मध्ये चांगला फलंदाज आहे. तो एक प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. जर तो मोठी खेळी खेळला तर आम्ही सामन्यापासून दूर होवू, त्यामुळे आम्हांला बाबरचा विकेट महत्वाचा असणार आहे.

आगामी टी20 विश्वचषकात अमेरिका संघ मजबूत दिसत आहे. शेवटच्या सामन्यात त्यांनी कॅनडाला धूळ चारत धमाकेदार अंदाजात विजय मिळवला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने 20 षटकात 194 धावाचे लक्ष्य अमेगिके समोर ठेवले होते धावांचा पाठलाग करताना यजमानांनी 17.3 षटकात विजय संपन्न केला होता.

महत्तवाच्या बातम्या-

रोहित समोर गेल, धोनीही फेल ‘हिटमॅनने’ गाठला 600 षटकारांचा आकडा!
‘कांगारुची’ ओमानवर वरचढ 39 धावांनी केला पराभव, मार्कस स्टाॅइनिसने गाजवले मैदान!
आयर्लंडविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---