टी20 विश्वचषक2024 मध्ये 9 जून रोजी भारत पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघाची सामना न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानावर आमने सामने येणार आहेत. या सामन्यात टाॅसची मात्र प्रमुख भूमिका असणार आहे. मागाल सामन्यांच्या रेकाॅर्ड्स वर नजर टाकले तर 2007 नंतर भारत पाकिस्तान यांच्यात टी20 विश्वचषकात जेवढे सामने झाले आहेत तेव्हा नंतर फलंदाजी करणऱ्या संघाने सामना जिंकला आहे.
टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूम 7 सामने झाले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 7 सामन्यांपैकी 6 सामने जिंकला आहे. तर पाकिस्तान ने एका सामन्यात बाजी मारली आहे. 2007 नंतर इंडिया पाकिस्तान यांच्यात टी20 विश्वचषकात 5 सामने झाले आहेत. तर 2009 आणि2010 मध्ये दोन्ही संघामध्ये सामना झाला नाही. 2012 च्या टी20 विश्वचषकापासून आतापर्यंत विश्वचषकात टीम इंडियाने 4 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. तर 2021 च्या टी20 विश्वचषक मध्ये पाकिस्तानने धावांचा पाठलाग करताना भारतास 10 विकेट्सनी मात दिला होता.
भारत आणि पाकिस्तान टी20 विश्वचषक सामन्यांचे निकाल (2007 पासून)
1. भारत विरुद्ध पाकिस्तान – 2012 टी20 विश्वचषक – भारत 8 विकेट्सने जिंकला
2. भारत विरुद्ध पाकिस्तान – 2014 टी20 विश्वचषक – भारत 7 गडी राखून जिंकला
3. भारत विरुद्ध पाकिस्तान – 2016 टी20 विश्वचषक – भारत 6 गडी राखून जिंकला
4. भारत विरुद्ध पाकिस्तान – 2021 टी20 विश्वचषक – पाकिस्तान 10 गडी राखून जिंकला
5. भारत विरुद्ध पाकिस्तान – 2022 टी20 विश्वचषक – भारत 4 गडी राखून जिंकला
रविवारी, 9 जून रोजी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल, तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होईल, असे विक्रम दर्शवित आहेत. आतापर्यंतच्या रेकाॅर्डनुसार नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकताना दिसत आहे. पण यंदा ही आकडेवारी बदलताना दिसेल का, हे पाहणं योग्य राहील.
महत्तवाच्या बातम्या-
विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis
कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विराटची बॅट तळपते, अशी आहे किंग कोहलीची पाकिस्तान विरुद्ध कामगिरी
विश्वचषकात अफगाणिस्तानची धमाल! एका वर्षात 4 मोठ्या संघांना पाजलंय पाणी