टी20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया 4 जुलै रोजी मायदेशी परतली. टीम इंडिया भारतात दाखल होताच चाहत्यांमधील जल्लोष पहायला मिळाले. बीसीसीआयने पाठवलेल्या विशेष विमानातून टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्ली मध्ये दाखल झाली. विमानतळावर पोहचताच चाहत्यांचा जल्लोष पहायला मिळाला. भारतीय संघ पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विजयी परेडसाठी मुंबईकडे रवाना झाला. मरिन ड्राईव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत भारतीय संघाची विजयी परेडचे आयोजन केले होते. तत्तपूर्वी टीम इंडिया नरिमन पाॅइंटला पोहचण्याआधी तेथील चाहत्यांचा जल्लोष करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये चाहते सुरुवातीला गणपतीची आरती म्हणत असतात पण तितक्यात कचऱ्याची गाडी तेथे येते. मग काय चाहते चक्क कचरा गाडीला पाहून पाकिस्तान पाकिस्तानचे नारे द्यायला सुरुवात केली. पाहा व्हिडिओ..
View this post on Instagram
तत्तपूर्वी टीम इंडिया ज्या विमानाने मुंबईला पोहचली होती. त्या विमानाला ‘वाॅटर सेल्यूट’ देण्यात आले होते. त्यानंतर मरिन ड्राईव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत टीम इंडियाची खुल्या बसमधून विजयी परेड करण्यात आली नंतर बीसीसीआयने झाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचे बक्षीस वितरण वानखेडे स्टेडियमवर करण्यात आले.
महत्तवाच्या बातम्या-
पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्यानं असं काही सांगितलं, जाणून तुम्ही पण व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ
नाद-बाद कॅच घेणाऱ्या सुर्याचे घरी झाले असे हटके ‘स्वागत’, पहा व्हिडीओ…
टीम इंडियाचे नवे पर्व सुरु, भारतविरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिकेला आजपासून सुरुवात