भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर नुकताच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. राहुल द्रविडनंतर आता बीसीसीआयने ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवली आहे. अशा परिस्थितीत गंभीर सध्या खूप चर्चेत आहे. तर दुसरीकडे, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे शाही लग्न होत आहे. त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा आहे. या शाही विवाहसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळी हजेरी लावत आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा भव्य विवाह पार पडला. अशा परिस्थितीत गौतम गंभीरही पत्नीसोबत अनंत अंबानींच्या शाही लग्नात पोहोचला. तो आणि पत्नी नताशा जैनची जोडी सुपरहिट दिसत होती.
गौतम गंभीर आणि त्याची पत्नी नताशा जैन यांची जोडी जबरदस्त दिसत होती. गंभीरने काळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर काळ्या रंगाचा वास्कट घातला होता. याशिवाय त्याची पत्नी नताशा जैन हिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
Anant Ambani-Radhika Merchant’s wedding: Indian cricket team head coach Gautam Gambhir (@GautamGambhir) arrives at Jio World Centre in Mumbai.
pic.twitter.com/DZJGpgtuXp— Ambuj Mishra (@Ambujmishra9090) July 12, 2024
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात केवळ गौतम गंभीर आणि त्याची पत्नी नताशाच नाही तर इतर भारतीय क्रिकेटर्सही दिसले होते. एमएस धोनी, सूर्यकुमार यादव, हार्दिक आणि कृणाल पंड्या देखील दिसले. इशान किशनही दिसला सोबतच जसप्रीत बुमराह पत्नी संजना आणि तिलक वर्मा देखील पहायला मिळाले.
याशिवाय गौतम गंभीरबद्दल बोलायचे झाले तर, गौतम गंभीरने आजपर्यंत कोणत्याही संघाचे कोचिंग केलेले नाही. मात्र, याआधी गौतम गंभीरने आयपीएलमध्ये लखनउ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी मेंटॉरची भूमिका बजावली आहे. तर गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जुलै आखेरीस टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
“माझा यावर अजिबात विश्वास नाही…”, गौतमने हार्दिकसह सर्व खेळाडूंना दिला ‘गंभीर संदेश’
कांगारूंना घेतलं धारेवर; ऑस्ट्रेलिया-युवराज सिंग जुनं नातं, वर्षे बदलली पण ‘सिक्सर किंग’ मात्र तोच
टी20 विश्वचषक 2007 ची पुनरावृत्ती? भारत विरुद्ध पाकिस्तान होणार फायनल, जाणून घ्या कधी रंगणार अंतिम सामना