---Advertisement---

‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा

Ajinkya-Rahane
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागील काही दिवसांपासून चर्चेचा धनी ठरत आहे. यामागील कारण म्हणजे, अलीकडेच अजिंक्य रहाणेने काऊंटी क्रिकेटमधून आपले नाव मागे घेतले होते. तो लीसेस्टरशायर संघाकडून खेळणार होता, पण रहाणेने संपूर्ण स्पर्धेतूनच नाव काढून घेतले. अशात अजिंक्य रहाणेने कारण सांगितले आहे. चला तर, रहाणेने नेमकं कशामुळे स्पर्धेतून नाव माघारी घेतलं, जाणून घेऊयात…

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यानुसार, त्याला त्याच्या फिटनेसवर काम करायचे आहे. त्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काऊंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायर (Leicestershire) संघाकडून खेळायचे होते, पण त्याने आता नाव मागे घेतले आहे.

काय म्हणाला रहाणे?
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणे काऊंटी क्रिकेट (Ajinkya Rahane County Cricket) स्पर्धेत का खेळणार नाही, हे सांगितले. तो म्हणाला की, “मागील चार महिन्यांपासून मी खूपच आव्हानात्मक क्रिकेट खेळत होतो आणि त्यामध्ये खूप मेहनत घेतली. अशात मी आता माझ्या शरीराला पुन्हा रिफ्रेश करू इच्छितो. जेणेकरून येत्या देशांतर्गत हंगामासाठी पूर्णपणे तयार होऊ शकेल. प्रत्येक स्तरावर मुंबईचे प्रतिनिधित्व करणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी पुढील 2 महिने आपल्या फिटनेसवर काम करेल. जेणेकरून ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेसाठी पूर्णपणे आपले सर्वोत्तम देऊ शकेल. त्यामुळे मी लीसेस्टरशायर संघाकडून काऊंटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. मला भारताच्या देशांतर्गत हंगामासाठी तयारी करायची आहे.”

https://twitter.com/ajinkyarahane88/status/1686674458445000704

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात चमकला होता रहाणे
अलीकडेच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणे खेळताना दिसला होता. मात्र, या मालिकेत त्याला बॅटमधून खास कामगिरी करता आली नव्हती. दोन डावात त्याला फक्त 11 धावाच करता आल्या होत्या. यापूर्वी 35 वर्षीय रहाणेने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने जवळपास दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. या सामन्यात त्याने आपल्या बॅटमधून शानदार कामगिरी केली होती. पहिल्या डावात त्याने 89, तर दुसऱ्या डावात 46 धावांची खेळी साकारली होती. मात्र, संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. (cricketer ajinkya rahane reveals the reason behind opting out county stint)

महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
‘या’ एका विकेटने पलटला आख्खा सामना, माजी दिग्गजाने सांगूनच टाकले भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---