इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि अष्टपैलू अक्षर पटेल हे ताफ्यात सामील झाले आहेत. पंत आणि अक्षर हे संघसहकारीसोबतच चांगले मित्रही आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पंत खाबी या नावाने प्रसिद्ध असलेल्या इंस्टाग्राम सेन्सेशन खबाने लामेसारखे एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे.
रिषभ पंतने (Rishabh Pant) बुधवारी (१६ मार्च) आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटी क्लिप शेअर केली होती. यामध्ये त्याने खाबीसारखे एक्सप्रेशन्स देत संघसहकारी अक्षर पटेलची (Akshar Patel) थट्टा उडवली आहे. झाले असे की, अक्षर आणि पंत बास्केटबॉल खेळत असतात. त्यावेळी पटेलकडून बॉल जाळीत टाकला जात नाही. मात्र, त्याच्यापुढे उभा असलेला पंत बरोबर जाळीत चेंडू टाकतो. यानंतर तो खाबीप्रमाणे आपल्या हाताने इशारा करतो. हा व्हिडिओ शेअर करत पंतने “असं असतं भावा,” अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
Why ⛹️ when you can stand and deliver? 🏀 #YehHaiNayiDilli @RishabhPant17 @khabyLame pic.twitter.com/wiYrGm3AgG
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2022
पंत आणि पटेल मंगळवारी (१५ मार्च) ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये आपल्या संघात सामील झाले. दोघेही श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग होते. यावेळी पंतने ३ डावांमध्ये ६१.६७च्या सरासरीने १८५ धावा केल्या. दुसरीकडे पटेलने दुसरा कसोटी सामना खेळताना ३ विकेट्स खिशात घातल्या.
संघात सामील झाल्यानंतरही दोन्ही खेळाडूंना आयसोलेशनमधून जावे लागणार नाही. कारण, दोघेही एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये गेले. आता दोघेही सरावाला सुरुवात करतील.
दिल्ली कॅपिटल्समध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून शेन वॉटसनचा समावेश
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी (१५ मार्च) ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनची (Shane Watson) सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. वॉटसन रिकी पाँटिंग (मुख्य प्रशिक्षक), अजित आगरकर (सहाय्यक प्रशिक्षक), प्रवीण अमरे (सहाय्यक प्रशिक्षक) आणि जेम्स होप्स (गोलंदाजी प्रशिक्षक) यांच्यासह दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला आहे.
आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा पहिला सामना २७ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड
‘यंदा आमचे प्रदर्शन जोरदार दिसेल, आमच्याकडे खूप सक्षम संघ’, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाची हुंकार