---Advertisement---

‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख

Ben-Stokes
---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स याच्याकडे होते. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्या कसोटीत शानदार विजय साकारला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला. मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत व्हावे लागले. यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने पराभवाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, अशाप्रकारच्या कसोटी सामन्याचा भाग होणे खूपच शानदार आहे. तसेच, कसोटी क्रिकेट हे याचसाठी ओळखले जाते. यावेळी स्टोक्सने न्यूझीलंडची प्रशंसाही केली.

वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला फक्त 1 धावेने पराभूत केले. तसेच, मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव पाचव्या दिवशी 256 धावांवरच संपुष्टात आला. अशाप्रकारे त्यांना 1 धावेने पराभवाचा धक्का बसला. या कसोटीत इंग्लंडचा फलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या रूपात शेवटची विकेट पडली. यावेळी त्याला स्वत:ला विश्वास बसला नाही की, तो बाद झाला आहे आणि इंग्लंड संघाने हा सामना गमावला आहे.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1630416341948858368

‘पराभवामुळे आम्ही खूपच निराश’
सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “कसोटी क्रिकेट हा अशाप्रकारच्या खेळासाठीच ओळखला जातो. हा खूपच जबरदस्त सामना होता. अनेक लोकांमध्ये खूपच भावना येत होत्या. कीवी संघही खूपच भावूक झाला होता. अशाप्रकारच्या कसोटी सामन्याचा भाग होणे शानदार आहे. प्रत्येकासाठी हा पैसा वसूल सामना राहिला. नील वॅगनर आणि टीम साऊदीला श्रेय जाते. त्यांनी इतकी जबरदस्त योजना आखली. या पराभवामुळे आम्ही निराश आहोत. आता ऍशेसपूर्वी आमच्याकडे काही महिने आहेत.”

https://twitter.com/englandcricket/status/1630447714369523712

खरं तर, इंग्लंंड संघाने त्यांचा पहिला डाव 8 विकेट्स गमावत 435 धावांवर घोषित केला होता. यावेळी इंग्लंडकडून जो रूट याने नाबाद 153, तर हॅरी ब्रूक याने 186 धावांची सर्वोच्च खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिल्या डावात फक्त 209 धावाच करता आल्या होत्या. यानंतर इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला. यावेळी दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 483 धावा चोपल्या. यामध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) याच्या 132 धावांच्या योगदानाचा समावेश होता. तसेच, टॉम ब्लंडेलने 90 धावांची खेळी साकारली. अशाप्रकारे न्यूझीलंडने इंग्लंडपुढे 257 धावांचे आव्हान ठेवले होते, जे पार करण्यात इंग्लंड संघ अपयशी ठरला. (cricketer ben stokes reacts on england loss in 2nd wellington test vs new zealand)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त एका धावेने कसोटीत विजय? पाहा किती वेळा घडलाय ‘हा’ इतिहास
कहर! एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद, 12 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---