मागील काही काळापासून सातत्याने भारतीय संघात प्रयोग केले जाताना दिसत आहेत. यामुळे अनेक अनुभवी खेळाडूंना बाहेर बसावे लागले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या नावाचाही समावेश आहे. अशात नुकतेच त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला पुनरागमनाविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. चला तर, भुवी काय म्हणाला हे जाणून घेऊयात…
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यानुसार, तो भारतीय संघातील पुनरागमनाचा प्रयत्न करत नाहीये. मात्र, त्याच्यामध्ये जे काही क्रिकेट शिल्लक आहे, त्याचा त्याला पूर्ण आनंद घ्यायचा आहे. त्याच्या मते, सध्या तो फक्त आपल्या क्रिकेटचा आनंद लुटत आहे आणि पुनरागमनावर लक्ष देत नाहीये.
काय म्हणाला भुवी?
भुवनेश्वर कुमार सध्या यूपी टी20 लीगमध्ये खेळत आहे. तिथे तो चेंडू आणि बॅट दोन्हीतून कमाल करत आहे. त्याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “जेव्हा तुम्ही या स्तरावर असता, तेव्हा तुम्हाला माहिती असते, की आणखी फक्त काहीच वर्षे खेळायची आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमच्या क्रिकेटचा आनंदा घ्यायचा असतो. मी यावेळी याच स्तरावर आहे. मी जरी भारतीय संघाचा भाग नसलो, तरी यामुळे मला काहीच फरक पडत नाही. असे नाहीये, की मी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा पुनरागमनासाठी आणखी काही योजना आखत आहे. मी फक्त क्रिकेट खेळण्यावर लक्ष देत आहे.”
अचूक टप्पा आणि स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला भुवनेश्वर कुमार सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. 33 वर्षीय गोलंदाजाने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2022मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले नाहीये. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) आणि विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठीच्या भारतीय संघातही त्याला निवडले गेले नाही. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भुवनेश्वरचे भारतीय संघातील पुनरागमन कठीण असल्याचे दिसत आहे. (cricketer bhuvneshwar kumar reacts on his comeback in indian team)
हेही वाचाच-
बांगलादेशला मोठा झटका! पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधीच ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर
‘सुपर-4च्या’ पहिल्या सामन्यात पाकिस्तान-बांगलादेश आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल माहिती