जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्या नावाचाही समावेश होतो. लारा याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. स्वत: दिग्गज फलंदाज असणाऱ्या लाराने त्याला विचारलेल्या प्रश्नावर भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाजाचे नाव घेत त्याची प्रशंसा केली. चला तर जाणून घेऊयात कोण आहे तो दिग्गज भारतीय फलंदाज, ज्याचे लाराने नाव घेतले.
दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) याने नुकतीच माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्याला विचारण्यात आले की, त्याने त्याच्या काळात कोणत्या दिग्गज सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाजांना पाहिले. लाराने यावेळी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे नाव घेतले. तसेच, त्याचे गोडवेही गायले.
काय म्हणाला लारा?
यावेळी लारा म्हणाला की, “निश्चितच सचिन तेंडुलकर. मी सचिनआधी भारतीय फलंदाजांबद्दल बोलणार नाही. कारण, त्यांच्याकडे सुनील गावसकर आणि मोहम्मद अझरुद्दीनसारखे खेळाडू होते. मात्र, जेव्हा तुम्ही भारतात भारतीय खेळाडूंबद्दल बोलता, तेव्हा तुमच्याविरुद्ध धावा करणारे अनेक फलंदाज आहेत.”
पुढे बोलताना लारा म्हणाला की, “जेव्हा भारतीय फलंदाज देशाबाहेर खेळतो, तेव्हा त्याला परिस्थितीमध्ये समतोल साधत खेळण्यात अडचणी येतात. ही पहिली गोष्ट मी सचिन तेंडुलकरसोबत पाहिली होती की, तुम्ही कुठे घेऊन जात आहात, हे महत्त्वाचे नसते. तसेच, गोलंदाज वेगवान आहे की, फिरकीपटू याचादेखील फरक पडत नाही. त्याच्याकडे अशी शैली होती की, तो सर्वकाही सांभाळण्याची क्षमता राखायचा.”
“माझ्या मते भारतीय जनतेने त्याला ओळखले आहे. त्यांना माहिती होते की, हा असा व्यक्ती आहे, जो प्रत्येक परिस्थितीत उभा राहतो. माझ्या मते, सचिनचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. पहिल्या दौऱ्यावर त्याच्या नाकाला दुखापत झाली होती. त्याच्या नाकातून रक्त वाहत होते. मात्र, तो उभा राहिला आणि फलंदाजी करू लागला. अशात अनेक फलंदाज तंबूत परतून उपचार घ्यायला गेले असते. सचिनने दाखवले की, त्याच्यात गुण आहे. याव्यतिरिक्त तो प्रतिभावान आहे. त्याची क्षमता आणि शैली एकदम उत्तम आहे. 25 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवणे खास आहे,” असेही तो म्हणाला.
फिरकीपटूंबद्दल बोलताना लारा याने श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न (Shane Warne) याचे नाव घेतले. तो म्हणाला, “मुरलीने माझी चिंता वाढवलेली. मी त्याच्याविरुद्ध बऱ्याच धावा केल्या. मात्र, तो खूपच हुशार फिरकीपटू होता. दुसरीकडे, शेन वॉर्न हा यासाठी महान बनला कारण, तो ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीतील फिरकीपटू होता. शेन वॉर्न प्रत्येक परिस्थितीत माहिर गोलंदाज होता. तो निश्चितच माझा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आहे. त्याच्या मानसिकरीत्या खूपच मजबूत होता.”
अशाप्रकारे, लाराने समकालीन दिग्गज फलंदाजामध्ये सचिनचे आणि गोलंदाजांमध्ये मुथैय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांची नावे घेतली. या तिघांच्या नावावर अनेक विक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यांचे काही विक्रम असे आहेत, जे अजूनही अबाधित आहेत. (cricketer brian lara praise sachin tendulkar and said he has technique capable of handling everything)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता 16 नाही, तर 20 संघांसोबत खेळला जाणार टी20 विश्वचषक 2024; सर्व माहिती एकाच क्लिकवर
‘मी भविष्यवाणी करतोय विश्वचषकात विराट गंभीरसारखाच…’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे भाष्य