आपण अनेकदा पाहतो की, क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुखापतग्रस्त होत असतात. काही दुखापती या सामान्य असतात, तर काही दुखापती या खूपच गंभीर असतात. त्यामुळे दुखापतग्रस्त खेळाडूला रुग्णालयात दाखल करावे लागते. आताही अशीच वेदनादायी दुखापत क्रिकेट सामन्यादरम्यान घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तुटले 4 दात
ही घटना श्रीलंकेतील लंका प्रीमिअर लीग (Lanka Premier League) या स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान घडली. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा खेळाडू चमिका करुणारत्ने दुखापतग्रस्त (Chamika Karunaratne Injured) झाला. त्याची ही दुखापत खूपच गंभीर होती. झेल घेण्याचा प्रयत्न करताना चेंडू थेट त्याच्या तोंडावर जाऊन लागला आणि त्यामुळे त्याचे 4 दातही तुटले. व्हायरल व्हिडिओत चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) याच्या तोंडातून रक्तही येताना दिसले.
Chamika Karunaratne lost 3-4 teeth while taking this catch. pic.twitter.com/cvB44921yZ
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2022
Chamika Karunaratne lost 4 teeth while taking a catchpic.twitter.com/WFphzmfzA1
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) December 8, 2022
व्हिडिओ व्हायरल
खरं तर, गाले ग्लॅडिएटर्स विरुद्ध कँडी फाल्कन (Galle Gladiators vs Kandy Falcons) संघातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. ग्लॅडिएटर्सचा फलंदाज नुवानीडू फर्नांडो याने कार्लोस ब्रेथवेटच्या चेंडूवर फटका मारला असता, चेंडू हवेत खूपच उंच गेला. यानंतर चमिका करुणारत्ने झेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली आला. यादरम्यान तो झेलाची लाईन समजू शकला नाही, त्यानंतर चेंडू थेट त्याच्या तोंडावर जाऊन लागला. चमिकाने झेल पकडला, परंतु जेव्हा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, तेव्हा समजले की, त्याच्या तोंडातून रक्त निघत आहे. त्याला तातडीने मैदान सोडावे लागले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे समजले की, त्याचे 4 दात तुटले आहेत.
Chamika Karunaratne suffered an injury while attempting a catch during the #LPL2022 match in Hambantota.
He has been hospitalized and is expected to undergo surgery.
It is believed the cricketer has lost several front teeth.
Video- AdaDerana #lka #SriLanka #CricketTwitter pic.twitter.com/84rxt0TF8a
— Dasuni Athauda (@AthaudaDasuni) December 7, 2022
सामन्याचा आढावा
या सामन्यात ग्लॅडिएटर्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मोविन सुबासिंघा (40 धावा) आणि इमाद वसीम (34) यांच्या दमदार खेळींच्या जोरावर संघाने 20 षटकात 121 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कँडी फाल्कन संघाचा फलंदाज कामिंदू मेंडिस याने 34 चेंडूत 44 धावा केल्या आणि संघाने 15 षटकात 123 धावा करत विजय मिळवला. (cricketer chamika karunaratne lost his 4 teeth while taking a catch lpl match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजाची पत्नी विजयाच्या अगदी जवळ, म्हणाली, ‘गुजरातची जनता…’
आता सुट्टी नाही! भारतात पुढील तीन महिने बॅक टू बॅक खेळले जाणार क्रिकेट, 3 बलाढ्य संघ येतायेत भारतात