सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील 4 सामने पार पडले असून भारत 3-1ने आघाडीवर आहे. तसेच, मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 3 डिसेंबर) खेळला जाणार आहे. अशात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने घोषणा केली आहे की, तो हा समज दूर करेल की, तो मुख्यत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधीलच गोलंदाज नाही, तर कसोटी क्रिकेटसाठीही तयार असेल.
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेदरम्यान दीपक चाहर (Deepak Chahar) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे 6 सामने खेळू शकला नव्हता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर बसावे लागले होते.
दीपक चाहर जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला की, “आम्ही जे काही करतो, त्यात तयारीचा समावेश असतो. जर तुम्ही पाहिले, तर माझी तयारी रणजी ट्रॉफी आणि आयपीएल (मागील हंगाम) स्पर्धेसाठीही चांगली झाली होती. जर मला अचानक सांगितले गेले, तर मी कसोटी सामना खेळू शकणार नाही. मी एक कसोटी खेळेल.”
तो पुढे म्हणाला की, “जर मला एक महिन्यापूर्वी सांगितले गेले, तर मी त्यानुसार तयारी करेल. मी त्यानुसार आपले वर्कलोड वाढवेल. माझ्याकडे स्विंग आहे, पण गोष्ट फक्त एवढी आहे की, मला तयारीसाठी एक महिन्याची गरज पडेल. मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळून चांगले वाटेल.”
राजस्थानकडून खेळणारा हा गोलंदाज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शानदार प्रदर्शन करत टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या संघात जागा बनवण्याच्या शर्यतीत आहे. त्याने या स्पर्धेत फक्त 5 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या. (cricketer deepak chahars wants to play test cricket for team india ind v aus)
हेही वाचा-
‘आता जेलमध्ये राहिलेल्या, मॅच फिक्स केलेल्या माणसाला सिलेक्शन कमिटीत घेणार’, माजी क्रिकेटरचे खडेबोल
IPL 2024 लिलावात कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये? केदारपासून ‘ही’ आहेत नावं