Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आतल्या गोटातील बातमी! आयपीएल 2023पूर्वी कार्तिकचा विराटविषयी मोठा खुलासा; जाणून घ्याच

आतल्या गोटातील बातमी! आयपीएल 2023पूर्वी कार्तिकचा विराटविषयी मोठा खुलासा; जाणून घ्याच

March 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Dinesh-Karthik-And-Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/RCBTweets


इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशात सध्या आरसीबी पॉडकास्ट भलतेच चर्चेत आहे. यामध्ये खेळाडूंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि संघसहकाऱ्यांविषयी रंजक खुलासे केले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचाही समावेश आहे. कार्तिक आयपीएल 2023मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. त्याने आरसीबीच्या एका पॉडकास्टमध्ये विराट कोहली याच्याविषयी खुलासा केला. हा व्हिडिओ आरसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला आहे.

दिनेश कार्तिकने गायले विराट कोहलीचे गुणगान
झाले असे की, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने नुकतेच भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “विराटने एक व्यक्ती म्हणून जे काही मिळवले आहे, त्यामुळे मागील 10 वर्षात संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्याचे सातत्य आणि क्षमता पाहून मला वाटत नाही की, क्रिकेटच्या दुनियेत दीर्घ काळापासून कुणीही हे मिळवले असेल.”

DK talks about going from a stroke maker to a finisher, the Nidahas trophy final heroics, getting lauded for his commentary skills from MSD, Virat's batting dominance and more, on @eatsurenow presents #RCBPodcast https://t.co/5WA7LBRoGN#PlayBold @DineshKarthik @DanishSait

— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 3, 2023

पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “आपण हे समजले पाहिजे की, तीन वेगवेगळे क्रिकेट प्रकार आहेत आणि तिन्हींमध्ये खेळूनही 50ची सरासरी गाठणे, परदेशात प्रवास करणे आणि धावाही करणे कठीण आहे. त्याच्याबाबत काय-काय बोलू, जितके बोलेल तितके कमीच वाटेल. विराट हा खूप चांगला व्यक्ती आहे. तो खूपच काळजी करणारा आणि भावूकही आहे. तो नेहमी मदतीसाठी पुढे असतो.”

‘धोनी भाईने माझ्या समालोचनाचा आनंद लुटला’
याव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा दमदार फलंदाज कार्तिकने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याबाबतही वक्तव्य केले. त्याने सांगितले की, धोनीनेही त्याच्या समालोचनाचा आनंद लुटला आहे. त्याने असेही सांगितले की, धोनीने केलेल्या प्रशंसेमुळे त्याच्या समालोचनात आणखी भर पडली.  तो म्हणाला, “मला समालोचन करण्याच्या जेवढ्या संधी मिळाल्या, मी त्याचा आनंद लुटला. मला वाटते की, मला खेळाबाबत जास्त बोलण्यात मजा येत आहे. मी याचे असे वर्णन करायचे आहे की, हा खेळ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते सहजरीत्या समजेल.” त्याने पुढे बोलताना म्हटले की, “माही भाईकडून समालोचनावर चांगली प्रतिक्रिया ऐकून खूप आनंद झाला. मी धोनी भाईला धन्यवादही दिला होता.”

आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेविषयी बोलायचं झालं, तर या स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे पार पडणार आहे. (cricketer dinesh karthik on virat kohli read here what he said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पंजाबी अभिनेत्रीवर आख्खं पाकिस्तान फिदा, पीएसएलमधील सामन्यादरम्यान चाहत्याची पोस्टरसोबत एन्ट्री
आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

"धोनीचे सर्वांवर बारकाईने लक्ष असते", कार्तिकने 'त्या' गोष्टीचा केला गौप्यस्फोट

Photo Courtesy: Twitter/Kevin Pieterson

अखेर पीटरसनने घेतली पंतप्रधान मोदींची भेट! खास कॅप्शनसह पोस्ट केले छायाचित्र

Jasprit Bumrah

"आता त्याला विसरा" विश्वविजेत्या खेळाडूने बुमराहच्या कारकिर्दीवरच लावले प्रश्नचिन्ह

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143