शनिवारी (दि. 25 फेब्रुवारी) 17व्या डीवाय पाटील टी20 चषक स्पर्धेचा अंतिम सामना डीवाय पाटील स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात रिलायन्स 1 संघाने डीवाय पाटील ब गट संघाला 1 धावेने रोमाचंक पद्धतीने पराभूत करत विजेतेपद आपल्या नावावर केले.
सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रिलायन्स 1 (Reliance 1) संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात 10 विकेट्स गमावत 153 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना डीवाय पाटील संघाने शेवटपर्यंत झुंज दिली, पण त्यांना पराभवाचा पत्करावा लागला. डीवाय पाटील संघाने 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 152 धावा केल्या. त्यामुळे हा सामना रिलायन्सने 1 धावेने जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघानेही ट्वीट करत अभिनंदन केले.
𝐑𝐞𝐥𝐢𝐚𝐧𝐜𝐞 𝐎𝐧𝐞 team clinch the 17th DY Patil T20 trophy 🏆
Congratulations team for the big win 💙#OneFamily pic.twitter.com/4VYGVvLxMN
— Mumbai Indians (@mipaltan) February 26, 2023
नाणेफेक जिंकत डीवाय पाटील ब गट संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय रिलायन्स 1 संघाने चुकीचा सिद्ध केला. रिलायन्सची सुरुवात तशी खराब झाली. त्यांनी दुसऱ्याच षटकात सलामीवीर कृष्णाची विकेट गमावली. तो 4 धावा करत 16 धावसंख्येवर बाद झाला. तिलक वर्मा (Tilak Varma) याला एकही धाव करता आली नाही. त्याला बलतेज सिंगने बाद केले. इथून पुढे रोहित रायुडू आणि ऋतिक शोकीन यांनी डाव सांभाळत 77 धावसंख्येपर्यंत मजल मारली. रायुडू 43 धावांवर बाद झाला. शोकीनने शानदार फटकेबाजी करत 34 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी साकारली. तसेच निहाल वढेराने 20 आणि विष्णू विनोद याने 16 धावांचे योगदान दिले. खालच्या फळीतील फलंदाज खास योगदान देऊ शकले नाहीत. तसेच, संघ एक चेंडू शिल्लक असतानाच बाद झाला. यावेळी डीवाय पाटील ब गट संघाकडून बलतेज सिंगने 4 विकेट्स, तर विनीत सिन्हाने 3 विकेट्स चटकावल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना डीवाय पाटील संघाचीही सुरुवात खास राहिली नाही. संघाला 20 धावसंख्येवर पहिला झटका लागला. त्यानंतर 32 धावसंख्येवर यश धूल 7 धावा करून बाद झाला. तिथून पुढे हार्दिक तमोरे आणि चिन्मय सुतार यांनी धावसंख्या 80च्या पार नेली. चिन्मयने यावेळी 23 आणि हार्दिकने 43 धावांची खेळी साकारली. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यादरम्यान 18 चेंडूत 5 चौकार मारत 27 धावांवर बाद झाला. हा डाव शेवटच्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी 7 धावांची गरज होती. मात्र, संघाने फक्त 5 धावा केल्या आणि सामना गमावला. यावेळी रिलायन्स संघाकडून मधवालने सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. (dy patil t20 cup 2023 reliance vs dy patil group final read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलींना पाहताच धूम ठोकणारा भारतीय खेळाडू कोण? सर्वात आळशी क्रिकेटरचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल झटका
युपी वॉरियर्झने WPL साठी निवडली आपली उपकर्णधार! ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाला मान