इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल हे युवा खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारं एक मोठं व्यासपीठ आहे. या स्पर्धेत कमाल कामगिरी करून खेळाडूंना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. मात्र, काहीवेळा कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचलेल्या खेळाडूंनाही म्हणावी तशी कामगिरी करता येत नाही. या स्टार खेळाडूंवर युवा खेळाडू वरचढ ठरताना दिसतात. असेच काहीसे आयपीएल २०२२मध्ये पाहायला मिळत आहे. अशात भारतीय संघ आणि रॉयलच चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज असलेला दिनेश कार्तिक याने यंदाच्या हंगामातील सर्वात प्रभावित करणाऱ्या ३ युवा वेगवान गोलंदाजांची नावे सांगितली आहेत.
यंदाच्या आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात प्रत्येक संघाकडे जवळपास एक तरी असा गोलंदाज होता, जो ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करत होता. वेगाची चर्चा होत असेल, तेव्हा उमरान मलिक (Umran Malik) याच्या नावाचा समावेश होणार यात शंकाच नाही. कारण, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाच्या या गोलंदाजाने आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान ताशी १५७ किमी वेगाने चेंडू टाकला होता. त्याच्याव्यतिरिक्त इतर अनेक वेगवान गोलंदाजांनी प्रभावित केले आहे. या संदर्भात चर्चा करताना दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या हंगामातील ३ युवा गोलंदाजांबद्दल बोलला आहे.
या यादीत कार्तिकने सर्वप्रथम पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाच्या अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याचे नाव घेतले आहे. कार्तिकने या गोलंदाजाची प्रशंसा करताना म्हटले की, “मला अर्शदीपने खूप प्रभावित केले. कारण, तो अखेरच्या षटकात खूप चांगली कामगिरी करतो. मला वाटते की, त्याने सर्वोत्तम नियंत्रणासह काही शानदार यॉर्कर चेंडू टाकले. जरी पंजाबकडे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत, पण अर्शदीपने शानदार गोलंदाजी केली आहे.”
कार्तिकच्या यादीत यश दयाल (Yash Dayal) आणि मोहसिन खान (Mohsin Khan) या तगड्या युवा गोलंदाजांचाही समावेश आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या यशबद्दल बोलताना तो म्हणाला की, “तो एक शानदार निवड आहे. यश नवीन चेंडूंना दोन्ही बाजूंनी फिरवू शकतो आणि मला त्याच्याबाबत ही गोष्टी चांगली वाटते.”
दुसरीकडे मोहसिन खानबाबत बोलताना तो म्हणाला की, “त्याला स्पर्धेत उशिरा निवडण्यात आले. मात्र, त्याने हे दाखवून दिले की, जेव्हाही गोलंदाजी करेल, तो शानदार करेल. त्याने यादरम्यान काही शानदार षटकेही टाकली. तो सलग षटकात ६पेक्षाही कमी धावा देतो. तसेच, त्याचा मंद चेंडूही खूपच प्रभावी आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनेश कार्तिकच्या या हंगामातील कामगिरीकडे पाहिले, तर त्याने १४ सामने खेळताना ५७.४०च्या सरासरीने २८७ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १ अर्धशतकही झळकावले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री केल्यानंतर काय म्हणाला राजस्थानचा ‘रॉयल’ कर्णधार संजू सॅमसन?
अखेर दिल्लीविरुद्ध अर्जुन तेंडूलकरचे होणार आयपीएल पदार्पण? अजून कोणी नव्हे जडेजानेच केलाय दावा
‘ज्याच्या पार्टीत जास्त मजा येईल’, चाहत्याने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शास्त्रींचे भन्नाट उत्तर