---Advertisement---

ईशानच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ काढत होता व्यक्ती, विस्फोटक खेळाडूची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद, पाहाच

On: गुरूवार, मार्च 23, 2023 11:21 PM
Ishan-Kishan-Video
---Advertisement---

जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीगचा समावेश होतो. या लीगचा 16वा हंगाम जवळ आला आहे. आयपीएल 2023 स्पर्धा येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाईल. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईच्या संघाचे हॉटेल बुक झाले आहे. अशात मुंबईचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ समोर आला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

खरं तर, मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती मुंबईचा विस्फोटक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याच्या शानदार खोलीतील दृश्य पाहत आहे. या खोलीतून समुद्राचे दर्शनही होते. व्हिडिओत अनेक सुविधांनी सजलेल्या खोलीत ईशानही दिसत आहे. मात्र, तो देखावा शूट करत असलेल्या व्यक्तीला ईशान बाहेर जाण्याचा ईशारा करतो. आता हा मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/mipaltan/status/1638916355767279617

मुंबईने शेअर केलेल्या या व्हिडिओला ट्विटरवर 37 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 500 हून अधिक लाईक्स आणि 35 कमेंट्सही आल्या आहेत. एकाने मजेशीर कमेंट करत लिहिले की, “नुसता राडा, खेळला नाही, तर कपडे फाडा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आला रे आला ईशान आला.” आणखी एकाने असे लिहिले की, “मी त्याच्यासाठी उत्सुक नाहीये.”

ईशान किशन हा मुंबई संघाचा विस्फोटक फलंदाज आहे. त्याने संघासाठी अनेक सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 75 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 29.22च्या सरासरीने 1870 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, 99 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. आता आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत ईशान काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (cricketer ishan kishan hotel room video mumbai indians players indian premier league)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेतील 265 डावांनंतरही चमकतोय ‘किंग’ कोहली, पठ्ठ्याची सरासरी आहे सचिन अन् धोनीपेक्षाही जास्त; वाचाच
भारताचा दारुण पराभव होताच दिग्गजाच्या विधानाने खळबळ; म्हणाला, ‘टीम इंडियाला रस्त्यासारख्या सपाट…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---