---Advertisement---

इशानने घेतला पंगा, मग विराटनेही दाखवला इंगा; Asia Cup Champion बनल्यानंतर स्टार खेळाडूंचा Video Viral

On: सोमवार, सप्टेंबर 18, 2023 3:02 PM
Virat-Kohli-And-Ishan-Kishan
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब 8व्यांदा आपल्या नावावर करण्याची जबरदस्त कामगिरी भारतीय संघाने करून दाखवली. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी हा विजय भारतीय खेळाडूंसाठी आत्मविश्वास वाढवणारा असू शकतो. भारताने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मैदानावर भारतीय खेळाडू मजा-मस्ती करताना दिसले. यादरम्यान इशान किशन याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो विराट कोहली याची चालण्याची नक्कल करताना दिसत आहे.

इशानने केली विराटच्या चालण्याची नक्कल
इशान किशन (Ishan Kishan) जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) याची नक्कल करत होता, तेव्हा मैदानावर श्रेयस अय्यर, शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या हेदेखील उपस्थित होते. यावेळी इशान शानदार पद्धतीने विराटप्रमाणे चालण्याची नक्कल ( Ishan Kishan Mimics Virat Kohli’s Walk) करताना दिसला. यानंतर विराट थोडीच मागे राहणार होता. विराटने इशानप्रमाणे चालण्याची नक्कल केली. यादरम्यान मैदानावरील इतर भारतीय खेळाडूंमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

इशानला सलामीची संध
अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजी प्रदर्शनानंतर भारतयी संघाने श्रीलंकेला 15.2 षटकात 50 धावांवर सर्वबाद केले. यानंतर छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिल याच्यासोबत इशान किशन याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली. दोघांनीही 6.1 षटकात हे आव्हान गाठले आणि भारताला 10 विकेट्सने विजय मिळवून दिला. यावेळी इशानने 18 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 23 धावांचा पाऊस पाडला.

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत इशानच्या बॅटमधून शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. त्याने पाकिसतानविरुद्धच्या साखळी सामन्यात महत्त्वाच्या क्षणी 81 चेंडूत 82 धावांची खेळी साकारत हार्दिक पंड्या याच्यासोबत भारतीय संघाचा डाव सावरला होता. मात्र, नंतर पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. इशानची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 4 डावात 47.67च्या सरासरीने 143 धावा केल्या. (cricketer ishan kishan mimics virat kohli walk and kohli s reaction goes viral see video)

महत्वाच्या बातम्या-
‘अरे! वर्ल्डकप जिंकल्यानंतर फोडा यार…’, रोहितने गाजवली पत्रकार परिषद; वाचा असं का म्हणाला ‘कॅप्टन’
रोहित-विराटसह ‘या’ भारतीय खेळाडूंच्या बायोपिकसाठी तमन्नाने निवडले साऊथ सुपरस्टार्स, पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---