Ishan Kishan Withdrawn: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका संपली आहे. आता उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यानंतर उभय संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. स्टार खेळाडूने मालिकेतून माघार घेतली आहे.
इशान किशन मालिकेतून बाहेर
भारतीय संघाचा युवा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून नाव माघारी घेतले आहे. इशानने वैयक्तिक कारणास्तव दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपले नाव माघारी घेतले आहे. बीसीसीआयने याची माहिती दिली आहे. मात्र, त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) याला बदली खेळाडू म्हणून संघात सामील करण्यात आले आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला महिन्याच्या अखेरीस 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 3 ते 7 जानेवारीदरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जाईल.
🚨 UPDATE 🚨: Ishan Kishan withdrawn from #TeamIndia’s Test squad. KS Bharat named as replacement. #SAvIND
Details 🔽https://t.co/KqldTEeD0T
— BCCI (@BCCI) December 17, 2023
केएस भरतने खेळलेत 5 कसोटी सामने
केएस भरत याने भारतीय संघाकडून कसोटीत 5 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 129 धावांची नोंद आहे. आंध्रप्रदेश संघाचा फलंदाज केएस भरतने भारताकडून अखेरचा कसोटी सामना जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या रूपात खेळला होता.
दुसरीकडे, इशान किशनपूर्वी मोहम्मद शमी हादेखील कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. शमी पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. त्याव्यतिरिक्त दीपक चाहरनेही वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही नाव मागे घेतले आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक) (cricketer ishan kishan withdrawn from india test squad against south africa ks bharat as a replacement)
हेही वाचा-
भारतीय संघाला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूची वर्णी
लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर