इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघातील सामना अत्यंत रोमांचकरीत्या पार पडत आहे. इंग्लंड संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. इंग्लंडचे वरच्या फळीतील पहिली तिन्ही फलंदाजांनी शानदार फटकेबाजी केली आहे. आधी जॉनी बेअरस्टोने 52, नंतर डेविड मलानने 140 आणि जो रूट याने 82 धावांची झंझावाती खेळी साकारली आहे. या खेळीसह रूटने इतिहास घडवला आहे.
रूटचा विक्रम
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट (Joe Root) हा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत आपलं स्वप्न जगत आहे. रूटने या स्पर्धेच्या बांगलादेशविरुद्धच्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात खास विक्रम नावावर केला आहे. खरं तर, रूट वनडे विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. रूटने या सामन्यात 68 चेंडूंचा सामना करताना 82 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, रूटने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 86 चेंडूत 77 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
– 77(86) in first match.
– 82(68) in second match.Joe Root continues his dream run in World Cup & gives a perfect platform for England, one of the finest players of this generation…!!!! pic.twitter.com/1Tjw4OYKWI
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2023
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे इंग्लंडचे फलंदाज
रूटने इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज ग्राहम गूच यांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यांच्या नावावर विश्वचषकात इंग्लंडकडून 21 सामन्यात सर्वाधिक 897 धावा करण्याचा विक्रम होता. मात्र, आता रूटने अवघ्या 19 सामन्यात 917 धावा करत त्यांचा विक्रम मोडला आहे. वनडे विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इयान बेल तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 19 सामन्यात 718 धावा केल्या होत्या. तसेच, चौथ्या स्थानी असलेल्या ऍलन लंब यांनी 19 सामन्यात 656 धावा केल्या होत्या. तसेच, पाचव्या स्थानी असलेल्या ग्रीम हिक यांनी 20 सामन्यात 635 धावा केल्या होत्या.
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सचिन
तसं पाहिलं, तर विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने विश्वचषकात 2278 धावा केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग असून त्याने 1743 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी असलेल्या कुमार संगकाराने 1532 आणि चौथ्या क्रमांकावरील ब्रायन लाराने 1225 धावा केल्या आहेत. (cricketer Joe Root becomes the leading run scorer for England in the ICC Cricket World Cup )
हेही वाचा-
बांगलादेशविरुद्ध मलानची तोडफोड फलंदाजी! ठोकले विश्वचषकातील आपले पहिले-वहिले शतक
आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांनंतर होणार क्रिकेटचे पुनरागमन, ‘या’ खेळांचाही समावेश