बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने आहेत. हा विश्वचषक 2023 स्पर्धेचा 40वा सामना आहे. या सामन्यात इंग्लंडच्या डावादरम्यान फलंदाज जो रूट खास कमाल करू शकला नाही. मात्र, यादरम्यान तो ज्या पद्धतीने बाद झाला, ते खूपच विचित्र होते. त्याला बाद होताना पाहून स्टेडिअममध्ये बसलेल्या चाहत्यानेही डोक्याला हात लावला. यादरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
इंग्लंड संघ आधीच विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. संघाने या स्पर्धेत खूपच खराब प्रदर्शन केले आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूट (Joe Root) याने त्याच्या मागील 5 डावात फक्त 29 धावा केल्या होत्या. मात्र, आपल्या 8व्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध चांगल्या लयीत दिसत होता. त्याने दुसऱ्या विकेटसाठी डेविड मलानसोबत चांगली भागीदारी बनवली होती. रूट 34 चेंडूत 28 धावांवर खेळत होता.
इंग्लंडच्या डावातील 21वे षटक टाकण्यासाठी लोगन व्हॅन बीक (Logan Van Beek) आला. तो पहिल्या स्पेलमध्ये खूपच महागडा ठरला होता. त्याने 4 षटकात 45 धावा खर्च केल्या होत्या. मात्र, 21व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने सामान्य लेंथ चेंडू टाकला, जो खेळपट्टीवर पडल्यानंतर आत घुसला. यावर रूट अनेक शॉट्स खेळू शकत होता, पण त्याने रिव्हर्स स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यावेळी चुकला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. यावेळी चेंडू त्याच्या दोन्ही पायांच्या मधून स्टम्पच्या दिशेने गेला आणि त्रिफळा उडला.
https://twitter.com/shawstopper_100/status/1722193208887898563?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1722193208887898563%7Ctwgr%5E36ad0f39bdb6cf969f68a439c02d75acfa29baec%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fcricket-hindi%2Fvideo-joe-roots-bizarre-dismissal-against-netherlands-left-england-fans-scratching-their-heads-6485494%2F
यावेळी रूटला समजलेच नाही की, नेमकं काय झालं. रूटने या सामन्यात 35 चेंडूंचा सामना करताना 28 धावा केल्या. त्याला या खेळीत फक्त 1 चौकार मारता आला. दुसरीकडे, स्टेडिअममध्ये बसलेल्या इंग्लंडच्या चाहत्याने आपल्या आवडत्या खेळाडूला अशाप्रकारे बाद होताना पाहून डोळे बंद केले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
This is Eng's most experienced player…plays such shots 🤣🤣🤣🤣 https://t.co/wSHnYIdN6z
— JSK (@imjsk27) November 8, 2023
सुरुवात चांगली
रूटने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अभियानाची सुरुवात शानदार केली होती. त्याने न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्ध रूटने 77 धावांची खेळी केली होती. तसेच, बांगलादेशविरुद्धही त्याच्या बॅटमधून 82 धावांचे झंझावाती अर्धशतक निघाले होते. मात्र, त्यानंतर त्याच्यासोबत संघाच्या इतर खेळाडूंचाही फॉर्म खराब झाला. (cricketer joe roots bizarre dismissal against netherlands left england fans scratching their heads see video)
हेही वाचा-
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच