जगभरातील सर्वात मोठी आणि सर्वांची आवडती इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही वर्षाभरात फक्त २ महिन्यांसाठी खेळवली जाते. यादरम्यान प्रेक्षक भरभरून सामन्यांचा आनंद लुटतात. मात्र, खेळाडूंना सातत्याने प्रवास करणे कठीण होते. कारण, अनेक खेळाडू आपल्या कुटुंबापासून दूर असतात. कोरोनाच्या काळात तर या गोष्ट खूपच वाढल्या आहेत. अशात अनेक दिवसांनी जर खेळाडू आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना भेटले, तर त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं राजस्थान रॉयल्स संघाचा जबरदस्त फलंदाज जोस बटलर याच्याबाबतही आहे.
जोस बटलर (Jos Buttler) हा देखील आपल्या कुटुंबापासून दीर्घ काळ लांब होता. मात्र, आता त्याचे कुटुंब भारतात आले आहे. राजस्थानने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बटलर आपल्या कुटुंबाला भेटल्याचे दिसत आहे. ही भेट कितीतरी महिन्यांनंतर होत आहे.
हॉटेलच्या लॉबीत जोस बटलर आपली मुलगी जॉर्जिया (Georgia) हिची गळाभेट घेताना दिसत आहेत. सोबतच त्याची पत्नी लुसी बटलरही आपल्या पतीची गळाभेट घेताना दिसत आहे. राजस्थानने शेअर केलेला हा भावूक व्हिडिओ इंग्लंडच्या बार्मी आर्मीनेही ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
The moment Jos Buttler was reunited with his family after months at the IPL 🥹
📹 @rajasthanroyals pic.twitter.com/w65xGOCf64
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) May 18, 2022
जोस बटलर आयपीएल सुरू होण्यापूर्वीच भारतात आला होता, तो गेल्या दोन महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहे. बटलर या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून ऑरेंज कप त्याच्याकडे आहे. जोस बटलरची मुलगी जॉर्जिया राजस्थान रॉयल्सच्या कँपमध्ये आल्यानंतर सर्वांची लाडकी बनली आहे. तिच्यासोबत अनेक खेळाडू खेळत आहेत, तसेच ती सरावाच्या वेळी मैदानावर पोहोचली होती. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संघाचा कर्णधार संजू सॅमसन जॉर्जियासोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.
View this post on Instagram
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जोस बटलरची हंगामातील कामगिरी
जोस बटलरने या हंगामात आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५२.२५च्या सरासरीने ६२७ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ अर्धशतके आणि ३ शतके झळकावली आहेत.
यंदाच्या हंगामातील राजस्थानची कामगिरी
या हंगामात राजस्थान रॉयल्स सर्वोत्तम खेळ दाखवत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. १३ सामन्यांमध्ये ८ विजयांसह संघाचे १६ गुण आहेत, त्यामुळे त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित आहे. शेवटच्या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी राजस्थानला प्लेऑफमध्ये जाऊन विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.
भले शाब्बास! आता गेल अन् डिविलियर्ससोबत घेतलं जाणार क्विंटन डी कॉकचं नाव, पाहा त्याचा पराक्रम