भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला संघाचा स्टार फलंदाज केन विलियम्सन आता फिट होताना दिसत आहे. विलियम्सनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत.
विलियम्सनने सुरू केला फलंदाजी सराव
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने दुखापतीतून पुनरागमन करत फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. विलियम्सनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो फलंदाजी करताना दिसत आहे. खास बाब अशी की, विलियम्सन या व्हिडिओत पूर्णपणे फिट असल्याचे दिसत आहे आणि तो त्याचे सर्व क्रिकेट शॉट्स मारत आहे. यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा आणखीच वाढल्या आहेत.
Great news for cricket fans.
Kane Williamson has started the batting practice. [Williamson Instagram] pic.twitter.com/slksSph61F
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2023
यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो आपल्या मुलीसोबत क्रिकेट खेळताना दिसत होता. या व्हिडिओत त्याची मुलगी चेंडू फेकत होती, तर विलियम्सन फलंदाजी करत होता. ज्यामध्ये त्याच्या फिट होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, आता त्याने नेट्समध्ये फलंदाजी करण्यास सुरुवात झाली आहे.
आयपीएलमध्ये झालेली दुखापत
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत विलियम्सन गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा भाग होता. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना विलियम्सन याला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या गुडघ्याचे ऑपरेशनही करावे लागले होते. त्यानंतरपासून त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा कमी झाल्या होत्या. मात्र, ज्याप्रकारे त्याने रिकव्हरी केली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत. चाहतेही त्याला एकदम फिट होऊन विश्वचषकात खेळताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. (cricketer kane williamson has started batting practice can play odi world cup 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’