धकाधकीच्या जीवनात सध्या कुणाकडेही फारसा वेळ नसतो. जेवणाबाबत बोलायचं झालं, तर फार क्वचित लोक असे असतात, जे बाहेरून काही न मागवता घरगुती जेवणास पसंती देतात. मात्र, जर आपण बाहेर असू किंवा जेवण बनवण्याचा आपल्याकडे वेळ नसेल, तर आपण फुड डिलिव्हरी ऍपवरून जेवण मागवतो. मग अशावेळी पोटात कावळे ओरडत असताना जर पटकन जेवण आले नसेल, तर नक्कीच प्रत्येकाची चिडचिड होते. असेच काहीसे मागील काही दिवसांपूर्वी आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज शुबमन गिलबाबत झाले होते. त्याने सोशल मीडियावर स्विगीविरुद्ध वेळेवर जेवण न मिळाल्याने आपला राग व्यक्त केला होता. आता स्विगीच्या अशाच धोक्याचा शिकार लखनऊ सुपर जायंट्स असलेला कृष्णप्पा गॉथम झाला आहे.
कृष्णप्पा गॉथमला (Krishnappa Gowtham) अनेक वेळ वाट पाहिल्यानंतर प्रत्युत्तरात जेवण नाही, तर असे उत्तर मिळाले, ज्याची कोणीही अपेक्षा केली नसेल. कृष्णप्पाने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर स्विगीच्या (Swiggy) हेल्पलाईन अकाऊंटला टॅग करत लिहिले की, “मला स्विगीचा सर्वात वाईट अनुभव आला आहे. माझी ऑर्डर #१३४६६९७३६४४८ रात्री ९.४५ वाजता देण्यात आली आणि मला अद्याप ऑर्डर मिळालेली नाही. ११.३५ वाजता मला शेवटी ग्राहक समर्थनाकडून प्रतिसाद मिळाला की, ते काहीही करू शकत नाहीत. हॅशटॅग RIPcustomercare.”
https://twitter.com/gowthamyadav88/status/1521554087996579840
कृष्णप्पासोबत ही घटना मंगळवारी (दि. ०३ मे) रोजी घडली. त्याच्यामते, त्याने जवळपास ९ वाजता जेवण ऑर्डर केले होते. मात्र, त्याला २ तासांनंतरही ऑर्डर मिळाली नाही. अशात त्याने सोशल मीडियाचा आधार घेत इतर अनेक लोकांसोबत आपला वाईट अनुभव शेअर केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गिलनेही केली होती स्विगीबद्दल तक्रार
यापूर्वी शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री ११च्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये शुबमन गिलने (Shubman Gill) लिहिले की, “एलॉन मस्क कृपया तू स्विगी विकत घे, जेणेकरून त्यांना वेळेत डिलीवरी पोहोच करता येईल.”
Elon musk, please buy swiggy so they can deliver on time. @elonmusk #swiggy
— Shubman Gill (@ShubmanGill) April 29, 2022
दोन्ही संघांची आयपीएल २०२२मधील कामगिरी
गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आयपीएल २०२२मध्ये पहिल्यांदा सहभागी झाले आहेत. तसेच, या दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळेच गुजरात १६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या आणि लखनऊ संघ १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सामनावीर पुरस्कार पटकावूनही हर्षल पटेल स्वत:शीच का नाहीये खुश? म्हणाला, ‘तुम्हाला भान असावे लागते’
लज्जास्पद! एमएस धोनी बाद होताच विराटने दिली शिवी? कोहलीची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद
एमएस धोनीमुळेच चेन्नई प्लेऑफमधून गेली बाहेर? ‘या’ खेळाडूला बाहेर करणं पडलं महागात






