नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त असणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा अपघातग्रस्त झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामील केले जाईल असा प्रश्न सातत्याने निर्माण होत होता. आता बीसीसीआयकडून याचे उत्तर आले आहे.
बीसीसीआयने (BCCI) कसोटी संघाचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून केएस भरत (KS Bharat) याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, बीसीसीआय ईशान किशन (Ishan Kishan) यालाही पहिल्यांदाच कसोटी संघात केएस भरत याचा पर्याय म्हणून सामील करेल.
अपघातानंतर पंत लवकरच मैदानावर परतणे कठीण आहे. अशात केएस भरत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंतची जबाबदारी सांभाळताना दिसेल. भरत दीर्घ काळापासून भारतीय कसोटीत पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून सामील होत आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेश संघाकडून खेळतो. वृद्धिमान साहा याच्यानंतर भरत भारतीय कसोटीत दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या रुपात उपस्थित आहे. भरत याने भारत अ संघाकडून अनेक सामने खेळले आहेत.
ईशान किशन शानदार फॉर्मात
ईशान किशन सध्या शानदार फॉर्मात आहे. त्याने 2022 सालाच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध वनडेत द्विशतक खेळी साकारली होती. पंतने सर्वात वेगवान द्विशतक झळकावले होते. तो सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीतही शानदार कामगिरी करत आहे. रणजीत ईशानने आतापर्यंत 2 सामन्यातील 4 डावात फलंदाजी करताना 180 धावा चोपल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केएस भरतची कामगिर
केएस भरत याने आतापर्यंत एकूण 84 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात 132 डावांमध्ये 37.46 च्या सरासरीने 4533 धावा चोपल्या आहेत. या दरम्यान त्याने 9 शतके आणि 25 अर्धशतकांची बरसात केली आहे. 308 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. याव्यतिरिक्त त्याने 64 अ दर्जाचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 6 अर्धशतकांच्या जोरावर 33.62च्या सरासरीने 1950 धावा केल्या आहेत. (cricketer ks bharat to make test debut against australia series and ishan kishan will be a backup wicketkeeper)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”
बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी