भारतीय सिनेसृष्टीतील युवा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे केवळ सिनेसृष्टीच नव्हे तर क्रिकेट क्षेत्रही हादरले होते. आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला जवळपास २ महिने झाले आहेत. पण, त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण अद्यापही समोर आलेले नाही. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
काही दिवसांपुर्वी सुशांतच्या वडीलांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरुद्ध एफआयआर दाखल केले होते. त्यामुळे सीबीआयकडून तिची चौकशी होत आहे. त्यामुळे पूर्ण देशात रियाची चर्चा होत आहे. या प्रकरणाबाबत भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने आपले मत मांडले आहे. Manoj Tiwari Tweet On Sushant Singh Rajput Case Targeting Rhea Chakraborthy
३४ वर्षीय तिवारीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत एक संदेश लिहिला आहे. दरम्यान त्याने कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण, त्याने जे काही लिहिले आहे, ते अप्रत्यक्षपणे एका व्यक्तीकडे संकेत करते. ती व्यक्ती अजून कोण नसून रिया चक्रवर्ती आहे. एवढेच नव्हे तर, तिवारीने या प्रकरणात क्रिकेटपटूंच्या काहीच न बोलण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तिवारीलाही वाटते की, सत्य लवकरात लवकर जगापुढे यायला पाहिजे. जर या प्रकरणात कोणी अपराधी असेल, तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तिवारीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर सुशांतच्या फोटोचा डीपीदेखील ठेवला आहे.
तिवारीने ट्विटमध्ये लिहिले की, “हे सर्व लोभी लोकांसाठी आहे. याला शेवटपर्यंत वाचा. पैसा फक्त आळशी मुलींना प्रभावित करतो. जेव्हा कोणती मुलगी मेहनत करते, तेव्हा तिच्यासाठी पैसा असणारा व्यक्ती हा बोनसप्रमाणे असतो. ना की तिच्या पुढे जाण्याच्या शिडीप्रमाणे.”
2 al d gold diggers out there. Read dis 👇
Money only impresses lazy girls. Wen a women works hard, a man wit money is a bonus, not a ladder to upgrade 👍#EDExposeRheaInSSRCase— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) August 10, 2020
एवढेच नव्हे तर, यापुर्वी तिवारीने म्हटले होते की, “क्रिकेटपटूंचे काम हे फक्त मैदानावर खेळणे इतकेच नसते. त्यांच्या अजूनही जबाबदाऱ्या असतात. जर देशात कोणते मोठे प्रकरण घडले असेल, तर चाहत्यांची इच्छा असते की क्रिकेटपटूंनी त्यावर आपले मत मांडावे. माझ्या अनेक चाहत्यांनी मला टॅग करत त्यांची हैराणी व्यक्त केली आहे. त्यांनी मला म्हटले आहे की, कोणताही क्रिकेटपटू या प्रकरणावर त्यांचे मत मांडत नाही. त्यांनी अशा प्रकरणांवर व्यक्त व्हायला पाहिजे.”
तरी तिवारीने चाहत्यांना म्हटले आहे की, “कोण या प्रकरणावर त्यांचे मत मांडेल किंवा नाही, हा त्यांचा निर्णय असेल. पण मी तसा नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
या दिग्गजाने निवडला किंग्स इलेव्हन पंजाबचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ, पहा कोणाला केलंय कर्णधार
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी