ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. हा कसोटी सामना स्टीव्ह स्मिथ याच्यासाठी खूपच खास होता. कारण, हा स्मिथचा 100वा कसोटी सामना होता. मात्र, 100व्या कसोटी सामन्यात स्मिथ वेगळी छाप पाडू शकला नाही. स्मिथच्या या खास सामन्यात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अली चमकला. मोईनने या सामन्यात अनोखे द्विशतक झळकावले. चला तर त्याच्या या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
कसोटीत मोईन अलीच्या 200 विकेट्स पूर्ण
ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 26 धावांच्या आघाडीसह मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. डेविड वॉर्नर याच्या रूपात 11 धावांवर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिली विकेट गमावली. ही विकेट स्टुअर्ट ब्रॉड याने घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरी विकेट 68 धावांवर मार्नस लॅब्यूशेन याच्या रूपात 26व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गमावली. विशेष म्हणजे, ही विकेट मोईन अली (Moeen Ali) याने घेतली. ही त्याची कसोटी कारकीर्दीतील 199वी विकेट होती. त्यानंतर मोईन अलीने 28वे षटक टाकताना चौथ्या चेंडूवर 100वा कसोटी सामना खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथ याला बेन डकेट याच्या हातून झेलबाद करत तंबूच्या दिशेने चालतं केलं. अशाप्रकारे मोईन अलीने 200 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या.
Test wicket No. 2⃣0⃣0⃣ for Moeen Ali and it’s the big one of Steve Smith ???? #WTC25 | #ENGvAUS ????: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/z6BoBp2bSX
— ICC (@ICC) July 7, 2023
मोईन अलीचा असाही विक्रम
इंग्लंड संघाकडून 200 विकेट्ससह 2500 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मोईन अलीच्या नावाचा समावेश झाला. मोईन 200 विकेट्स आणि 2500 हून अधिक धावा करणारा इंग्लंडचा चौथा खेळाडू ठरला. या यादीत पहिल्या स्थानी स्टुअर्ट ब्रॉड आहे. त्याने कसोटीत 596 विकेट्स घेतल्या असून फलंदाजी करताना 3640 धावाही केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी सर इयान बॉथम आहेत. त्यांनी कसोटीत 383 विकेट्स चटकावत फलंदाजी करताना 5200 धावांचा पाऊस पाडला होता. यादीत अँड्र्यू फ्लिंटॉफ तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 218 विकेट्स आणि फलंदाजी करताना 3795 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त आता चौथ्या स्थानी मोईन अली विराजमान झाला आहे. त्याने 200 विकेट्स घेण्याव्यतिरिक्त फलंदाजी करताना 2972 धावांचा पाऊसही पाडला आहे. यादरम्यान त्याच्या नावावर 5 शतकांचाही समावेश आहे.
कसोटीत 200 विकेट्स आणि 2500 हून अधिक धावा करणारे इंग्लंडचे खेळाडू
स्टुअर्ट ब्रॉड- 596 विकेट्स आणि 3640 धावा
सर इयान बॉथम- 383 विकेट्स आणि 5200 धावा
अँड्र्यू फ्लिंटॉफ- 218 विकेट्स आणि 3795 धावा
मोईन अली- 200 विकेट्स आणि 2972 धावा*
ऑस्ट्रेलियाचा 36 षटकांपर्यंतचा खेळ
ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यातील दुसऱ्या डावात 36 षटकांपर्यंत 91 धावा करत 4 विकेट्स गमावली आहेत. या चार विकेट्समध्ये उस्मान ख्वाजा, डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दिग्गजांचा समावेश आहे. पहिल्या डावातील 26 धावांसह ऑस्ट्रेलिया संघ 116 धावांनी आघाडीवर खेळतोय. 36व्या षटकानंतर खेळपट्टीवर ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श खेळतायेत. आता इथून पुढे धावसंख्येत काय बदल होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (cricketer Moeen Ali dismissed Steve Smith to complete 200 wickets in Test cricket career)
महत्वाच्या बातम्या-
निसांकाची विंडीजविरुद्ध विक्रमी सेंच्युरी! बनला कमी वनडे डावांत सर्वाधिक शतके ठोकणारा दुसरा श्रीलंकन
करियरचा 100वी कसोटी स्मिथनं यादगार बनवलीच! फिल्डर म्हणून कोरलं इतिहासात नाव