पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात कराची येथील राष्ट्रीय स्टेडिअममध्ये २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात मिळाली. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ मजा-मस्तीच्या अंदाजात पाहायला मिळाले. त्यांच्या मस्तीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
झालं असं की, ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ७१ व्या षटकात पाकिस्तानचा नौमान अली (Nauman Ali) गोलंदाजी करत होता. त्यावेळी स्मिथ (Steve Smith) ५४ धावांवर फलंदाजी करत होता. नौमानने टाकलेल्या तिसरा चेंडू स्मिथच्या पायावर लागला आणि यानंतर पाकिस्तानी खेळाडू पायचीत झाल्याची अपील करू लागले. मात्र, मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी स्मिथला नाबाद घोषित केले.
यानंतर पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशी सल्ला-मसलत करू लागले. डीआरएससाठी १५ सेकंदांचा वेळ मिळतो. हा वेळ निघून जात होता, तेवढ्यात रिझवानने (Mohammad Rizwan) स्मिथच्या गळ्यावर हात ठेवत मजेशीर अंदाजात विचारले की, त्याच्या संघाने डीआरएस घेतला पाहिजे का? मात्र, तोपर्यंत डीआरएस घेण्याची वेळ संपली होती. त्यामुळे पाकिस्तानी संघाला रिव्ह्यू घेता आला नाही.
To DRS or not to DRS 🤔 #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/X3b9mp8uaF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 12, 2022
स्मिथ ८६ व्या षटकात हसन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २१४ चेंडूंचा सामना करताना ७२ धावांची खेळी केली. यामध्ये ७ चौकारांचा समावेश होता. चाहत्यांची या व्हिडिओला खूपच पसंती मिळत आहे. यासोबतच रिझवानच्या या मजेशीर अंदाजाचीही प्रशंसाही करत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी ३ विकेट्स गमावत २५१ धावा केल्या होत्या. सलामीवीर उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) नाबाद शतकी खेळी केली.
ख्वाजा पहिल्या दिवशी २६६ चेंडूत १२७ धावांवर नाबाद होता. मात्र, दुसऱ्या दिवशी तो १६० धावांवर बाद झाला. यामध्ये १ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. या डावात डेविड वॉर्नर आणि मार्नस लॅब्यूशेन यांना खास कामगिरी करता आली नाही. ते अनुक्रमे ३६ आणि ० धावसंख्येवर तंबूत परतले.
ऑस्ट्रेलिया संघ ८ विकेट्स गमावत ५०५ धावांवर खेळत आहे.
Video: न्यूझीलंडची सुपरवुमन! विश्वचषकात ग्रीनने एलिसा पेरीचा घेतलेला झेल पाहून व्हाल थक्क