भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यात निराशाजनक कामगिरी करत आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात 1 विकेट्सने आणि बुधवारी (दि. 07 डिसेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात 5 धावांनी भारताला पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने मेहिदी हसन मिराज याच्या शानदार शतकाच्या जोरावर महमुदुल्लाहसोबत 148 धावांच्या भागीदारीच्या मदतीने 9 विकेट्स गमावत 271 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान पार करताना एकेवेळी भारत हा सामना जिंकतोय असे वाटत होते, पण एका चुकीमुळे विजयावर पाणी फेरले गेले.
बांगलादेश (Bangladesh) संघाने दिलेल्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ (Team India) 9 विकेट्स गमावत 266 धावाच करू शकला. त्यामुळे दुसरा वनडे सामना बांगलादेशने 5 धावांनी खिशात घातला आणि मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तो बांगलादेशच्या हातातून हा विजय भारताकडे खेचत होता. मात्र, एक चूक महागात पडली.
Bangladesh hold their nerve to win a thriller 🙌#BANvIND | Scorecard 👉 https://t.co/A76VyZDXby pic.twitter.com/d2pDja0lQV
— ICC (@ICC) December 7, 2022
तसं पाहिलं तर, दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या पराभवाचे मोठे कारण विराट कोहली आणि शिखर धवन ही सलामी जोडी ठरली. कारण, त्यांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. तसेच, रोहित शर्मा दुखापतग्रस्त होऊन मैदानातून बाहेर पडला, हेही कारण यात सामील आहे. मात्र, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जाऊ शकते. कारण, त्याने महत्त्वाच्या वेळी एक-दोन नाही, तर आख्खे षटक निर्धाव खेळून काढले. त्यामुळे रोहितवरील दबाव वाढला होता.
भारताने 47व्या षटकात 8 विकेट्स गमावत 232 धावसंख्या उभारली होती. विजयासाठी 18 चेंडूत 40 धावांची आवश्यकता होती. 48वे षटक मुस्तफिजुर रहमान टाकण्यासाठी आला होता. त्याचा सामना करण्यासाठी क्रीझवर मोहम्मद सिराज होता. या षटकात सिराजने 1-2 नाही, तर सर्वच्या सर्व 6 चेंडू निर्धाव खेळले. त्यामुळे हे षटक निर्धाव ठरले. पुढे भारताला 12 चेंडूत 40 षटकांची गरज होती. शेवटी 2 षटकात रोहितने धावा बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तो उरलेल्या 5 धावा करण्यात अपयशी ठरला. रोहितने 49 व्या षटकात 20 आणि शेवटच्या षटकात 14 धावा केल्या. त्याने या सामन्यात 28 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा वनडे सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. (cricketer mohammed siraj becomes first indian batter who faced maiden 48 over in odi cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रीडाविश्व हादरलं! 16 वर्षीय मुलाचे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
रोहित शर्माने दुखापतीविषयी स्वतः दिली माहिती, बांगलादेश दौऱ्यातून घेऊ शकतो माघार?