भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. हा सामना बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. अशात हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या दौऱ्यावर संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज होता. मात्र, आता आशिया चषक आणि वनडे विश्वचषक 2023 यांसारख्या मोठ्या स्पर्धांकडे पाहता, त्याच्या कामाचा तणाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Mohammed Siraj has been rested for the ODI vs West Indies. [Espn Cricinfo] pic.twitter.com/QxlFB7b5Qj
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2023
एका प्रतिष्ठित क्रिकेट वेबसाईटनुसार, मोहम्मद सिराज हा कसोटी संघाचा भाग राहिलेल्या आर अश्विन, केएस भरत, अजिंक्य रहाणे आणि नवदीप सैनी यांच्यासोबत भारतात परतला आहे. त्याच्या कामाच्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताला 5 सामन्यांची टी20 मालिकाही खेळायची आहे. मात्र, सिराज टी20 संघाचा भाग नाहीये. बीसीसीआयने अद्याप सिराजच्या बदली खेळाडूची घोषणा केली नाहीये.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आता भारताकडे वेगवान गोलंदाजांच्या रूपात उमरान मलिक, हार्दिक पंड्या, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतही सिराज खेळणार नाहीये. मात्र, यानंतर सलग तीन महिने तो खेळताना दिसेल. ऑगस्टच्या अखेरीस आशिया चषक 2023 स्पर्धेची सुरुवात होईल. यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. तसेच, ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान भारतात वनडे विश्वचषकही खेळला जाणार आहे.
सिराजची 2022पासूनची कामगिरी
सिराजच्या मागील वर्षी म्हणजेच 2022पासूनची कामगिरी पाहिली, तर त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. हे इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याची उणीव नक्कीच भासेल. (cricketer mohammed siraj flies back home after being rested from odis against west indies ind vs wi)
महत्त्वाच्या बातम्या-
गावसकर ‘या’ देशाला मानतात आपलं दुसरं घर, सुनील पुकारताच का होतात खुश? घ्या जाणून
MS Dhoniचे 11 वर्षांपूर्वीचे जॉब ऑफर लेटर व्हायरल, पगाराचा आकडा वाचून धक्काच बसेल