---Advertisement---

धोनीचा ‘असा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल! अभिनेता योगी बाबूसोबत मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद

On: रविवार, जुलै 16, 2023 9:53 AM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनी याचे नाव आघाडीवर आहे. धोनीने आयपीएल 2023 हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचवी ट्रॉफी जिंकून दिली. यानंतर आता धोनी त्याच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. मागील काही दिवसांपासून धोनीचे चाहत्यांसोबतच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये आता आणखी एका व्हिडिओचा समावेश झाला आहे. मात्र, या व्हिडिओत तो कोणत्याही चाहत्यासोबत नाही, तर अभिनेत्यासोबत दिसत आहे.

योगी बाबूसोबत ‘माही’
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एमएस धोनी (MS Dhoni) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता योगी बाबू (Yogi Babu) याच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओत धोनी आणि योगी बाबू एकमेकांना केक चारताना दिसत आहेत. धोनीचा हा व्हिडिओ चेन्नईमधील आहे. खरं तर, धोनी त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या ‘लेट्स गेट मॅरिड’ (Let’s Get Married) या पहिल्या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजसाठी पोहोचला होता. धोनीच्या सिनेमात योगी बाबूनेही भूमिका साकारली आहे.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1680106059527262208

धोनीविषयी बोलायचं झालं, तर त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात जबरदस्त प्रदर्शन केले होते. अंतिम सामन्यात सीएसके (CSK) संघाने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध शानदार विजय मिळवला होता. यासह सीएसकेच्या खात्यात पाच ट्रॉफींचा समावेश झाला. सीएसकेने सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची बरोबरी केली होती. मुंबईनेही आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1679375784367235072

या विजयानंतर सीएसकेचा कर्णधार धोनीने त्याच्या गुडघ्याची सर्जरी केली होती. मात्र, सध्या धोनी यामधून बरा होत आहे. धोनीच्या या व्हिडिओनंतर तो वेगाने बरा होत असल्याचे दिसत आहे. आयपीएल 2023 दरम्यान असे म्हटले जात होते की, धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेईल. मात्र, त्याने शरीराने साथ दिली तर आणखी एका हंगामात खेळणार असल्याचे चाहत्यांना सांगितले. चाहत्यांना आशा आहे की, तो आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात नक्कीच आपला जलवा दाखवेल. (cricketer ms dhoni and south actor yogi babu have fun video goes viral)

महत्वाच्या बातम्या-
विंडीजविरुद्ध 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार विराट, 499 सामन्यांमधील परफॉर्मन्स आहे तरी कसा? वाचाच
‘विश्वचषकात भारतीय मुस्लिम पाकिस्तानला…’, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने देशभरात खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---