---Advertisement---

धक्कादायक! माजी भारतीय खेळाडूच्या वडिलांना अटक, कोर्टाचा एक दिवसीय रिमांडचा आदेश, काय आहे प्रकरण?

On: मंगळवार, जून 7, 2022 7:44 AM
Naman-Ojha-And-Virender-Sehwag
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू असलेल्या नमन ओझा याच्या वडिलांना म्हणजेच विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बातमीने क्रिकेटविश्वालाही धक्का बसला आहे. मात्र, कोणत्या कारणामुळे त्यांना ही अटक झाली, चला तर जाणून घेऊया.

का झाली अटक?
खरं तर, पोलिसांनी बँक फसवणूक प्रकरणात विनय ओझा (Vinay Ojha) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra) जॉलखेडा शाखेत २०१३मध्ये झालेल्या जवळपास १.२५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कलम ६५,६६अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी इतर आरोपींनाही आधीच अटक केली आहे. असे म्हटले जात आहे की, विनय ओझा दीर्घ काळापासून फरार होते. अटकेनंतर न्यायालयाने विनय ओझा यांना एका दिवसाच्या रिमांडवर पाठवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---