बुधवारी (दि. 24 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. हा सामना मुंबईने 81 धावांनी खिशात घातला आणि क्वालिफायर 2 सामन्याचे तिकीट मिळवले. मात्र, या सामन्यादरम्यान गच्च भरलेल्या स्टेडिअममध्ये नवीन उल हक याला चाहत्यांची आरडाओरड ऐकावी लागली. जेव्हा तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचा, तेव्हा त्याला गर्दीतून विराट कोहली याच्या नावाने चाहते डिवचायचे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता याबाबत नवीनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हायरल होत असेलल्या व्हिडिओत चाहते ‘कोहली-कोहली’ (Kohli-Kohli) म्हणत नवीन उल हक (Naveen ul Haq) याला डिवचताना दिसले. यावेळी तोदेखील त्यांना हातवारे करत ‘अजून बोला’ असे म्हणताना दिसला. सामन्यानंतर नवीन म्हणाला की, त्याने बुधवारी (दि. 24 मे) स्टेडिअममध्ये ‘कोहली-कोहली’ या कल्लोळाचा आनंद घेतला. कारण, त्यामुले त्याला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. चालू हंगामातील साखळी फेरीदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen ul Haq) यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती.
Naveen rod today Kohli Kohli chants
credits:kolly na bois #LSGvMI #ViratKohli pic.twitter.com/X7JCoJmIce— Avenger???? (@AvengersReturn) May 24, 2023
काय म्हणाला नवीन?
मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात 4 विकेट्स घेणारा नवीन म्हणाला की, “मी याचा आनंद घेतला. मला मैदानावर सर्वांचे त्याचे (विराट कोहली) किंवा इतर कोणत्याही इतर खेळाडूचे नाव घेणे आवडते. यामुळे मला माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. मी बाहेरच्या गोष्टींबाबत विचार करत नाही. मी फक्त आपल्या क्रिकेट आणि आपल्या प्रक्रियेवर लक्ष देतो. प्रेक्षकांची घोषणाबाजी किंवा इतर कुणी काहीही म्हटले तरी मला फरक पडत नाही.”
पुढे बोलताना नवीन म्हणाला की, “व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला याचा सामना करत पुढे जावे लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा चाहते तुमच्यावर निशाणा साधतील. जेव्हा तुम्ही संघासाठी चांगली कामगिरी कराल, तेव्हा हेच लोक तुमचे कौतुक करतील. हा खेळाचा भाग आहे.”
नवीनची उत्कृष्ट गोलंदाजी
मुंबई इंडियन्सविरुद्ध गोलंदाजी करताना नवीन उल हक याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी केली. या षटकात त्याने 38 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. त्याने यादरम्यान रोहित शर्मा, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या विस्फोटक फलंदाजांना बाद केले. (cricketer naveen ul haq reaction on virat kohli chants during lsg vs mi ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोंड उघडे करून निवांत झोपलेला तिलक, सूर्याने लिंबू पिळताच झोपेला लागला चुना; Video जोरात व्हायरल
गुजरातच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून मुंबईला धोका! धुरंधरांनी गाजवलाय आख्खा हंगाम, कधीही देऊ शकतात मात