इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 45वा सामना बुधवारी (दि. 3 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जात होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये 1-1 गुण मिळाले. सामना रद्द झाल्यानंतर चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी लखनऊच्या खेळाडूंना भेटला. यादरम्यानचे काही खास फोटो लखनऊने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स संघाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen ul Haq) हादेखील एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबत दिसत आहे. मात्र, या फोटोंवरून असे वाटत आहे की, काही चाहत्यांना एमएस धोनी आणि नवीन उल हक (MS Dhoni And Naveen ul Haq) यांचे हे फोटो आवडले नाहीयेत. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.
https://www.instagram.com/p/Crz-m_oN-xS/?utm_source=ig_embed&ig_rid=ef6360ea-5132-496d-8149-b594486ff20f
एका युजरने लखनऊच्या या इंस्टा पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “नवीनचा बाप आहे कोहली.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “बापाशी पंगा घेणार नवीन.” आणखी चाहत्यांनीही आपला राग व्यक्त केला आहे. अशाच काही कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहत्यांच्या कमेंट्स
एका ट्विटर युजरने कमेंट केली की, “काहीही म्हणा, विराट हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे.”
https://twitter.com/meinsamriti/status/1654035924286578688?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1654035924286578688%7Ctwgr%5E8c5baa7a3c4574956639ab7e4227bb15124fcdb2%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-naveen-ul-haq-took-a-photo-with-ms-dhoni-fans-are-reacting-like-this-6093575.html
दुसऱ्या एकाने लिहिले की, “परिस्थिती वेगळी आहे मित्रा.”
https://twitter.com/vipintiwari952/status/1654047101192658950?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1654047101192658950%7Ctwgr%5E8c5baa7a3c4574956639ab7e4227bb15124fcdb2%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-naveen-ul-haq-took-a-photo-with-ms-dhoni-fans-are-reacting-like-this-6093575.html
काय आहे प्रकरण?
आयपीएल 2023च्या 43व्या सामन्यात लखनऊ विरुद्ध बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक (Virat Kohli And Naveen ul Haq) यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून बाचाबाची झाली. मात्र, प्रकरण जास्त वाढताना पाहून अमित मिश्राने मध्यस्थी केली.
सामना संपल्यानंतर हातमिळवणी करताना खेळाडू पुन्हा एकदा एकमेकांशी भिडले. यावेळी लखनऊचा मार्गदर्शकही गौतम गंभीरही मध्ये आला. त्यामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यातही जोरदार बाचाबाची झाली. या भांडणानंतर चाहते दोन गटात विभागले. काहींनी गंभीरची बाजू घेतली, तर काहींनी विराटला पाठिंबा दिला. (cricketer naveen ul haq took a photo with ms dhoni fans are reacting like this)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 11 ओव्हर खेळून फक्त 9 धावांवर Allout झाला ‘हा’ संघ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कारनामा
हैदराबादला धूळ चारल्यानंतर केकेआरचा कॅप्टन भलताच खुश; म्हणाला, ‘आम्ही जुगार खेळला…’