नुकतेच काही दिवसांपूर्वी कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अशात वेस्ट इंडिज क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने टी२० आणि वनडे संघासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
आयपीएल २०२२मध्ये धुमाकूळ घालणारा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनला (Nicholas Pooran) वेस्ट इंडिजचा नवीन कर्णधार (West Indies New Captain) म्हणून घोषित केले आहे. त्याच्याकडे वनडे आणि टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे की, “त्याची नियुक्ती २०२२मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आणि ऑक्टोबर २०२३मध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी करण्यात आली आहे. दुसरीकडे शाय होपकडे वनडे संघाचे उपकर्णधारपद सोपवले आहे.”
.@nicholas_47 is looking forward to the new challenge as West Indies' new White-ball captain. #MenInMaroon pic.twitter.com/5chzTzOEZu
— Windies Cricket (@windiescricket) May 3, 2022
याव्यतिरिक्त आयसीसीनेही ट्वीट करत निकोलस पूरनला कर्णधार बनवल्याची माहिती दिली आहे.
🚨 JUST IN: Nicholas Pooran has been named the limited-overs captain of West Indies.
Details 👇 https://t.co/U712JWZ2LN
— ICC (@ICC) May 3, 2022
निवेदनात वेस्ट इंडिजने पूरनबद्दल सांगितले गेले की, “निकोलस पूरन हा विशेषत: प्रतिभावान क्रिकेटपटू आहे आणि मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. आम्हाला विश्वास आहे की, तो नेतृत्व शिकण्याच्या आणि यशस्वीपणे पुढे वाटचाल करत राहील. मी वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी निकोलसला योग्य तो पाठिंबा आणि प्रोत्साहन द्यावे.”
हे कर्णधारपद सांभाळल्यानंतर पूरन म्हणाला की, “वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याचा मला खरोखरच सन्मान वाटतो. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी एक अद्भुत वारसा निर्माण करणाऱ्या अनेक दिग्गजांच्या पावलावर पाऊल टाकून, ही खरोखरच एक प्रतिष्ठित भूमिका आहे. क्रिकेट ही अशी शक्ती आहे, जी आपल्या सर्व वेस्ट इंडिजला एकत्र आणते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “कर्णधार हे माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचे मुख्य आकर्षण राहिले आहे. मी माझ्या चाहत्यांसाठी मैदानावर उत्कृष्ट गोष्टी साध्य करत संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.” कर्णधाराच्या रूपात त्याची पहिली वनडे मालिका नेदरलँडमध्ये ३१ मेपासून सुरू होणार आहे.
निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
निकोलस पूरनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ३७ वनडे आणि ५७ टी२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ४०.०३च्या सरासरीने ११२१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकेही झळकावली आहेत. याव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये त्याने २७.७४च्या सरासरीने ११९३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ८ अर्धशतकांची बरसात केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निकोलस पूरनची आयपीएल कारकीर्द
निकोलस पूरनने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ६०च्या सरासरीने १८० धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने १ अर्धशतकही केले आहे. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद ६४ इतकी आहे. याव्यतिरिक्त त्याच्या एकूण आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ४२ सामने खेळले असून त्यात २६.२०च्या सरासरीने ७८६ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील धोनीची लोकप्रियता पाहून भारावला निकोलस पूरन; म्हणाला, ‘मी कधीच विसरणार नाही…’
राजस्थानविरुद्धच्या खेळीमुळे चर्चेत आलेल्या रिंकू सिंगला एकवेळ बीसीसीआयने केले होते बॅन, वाचा किस्सा
हार्दिक पंड्याच्या मुलाला कडेवर घेऊन राशिद खानने लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय