इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंमध्ये अफगाणिस्तान संघाचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान याच्या नावाचाही समावेश आहे. राशिदने गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, आता त्याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयपीएल 2023 अंतिम सामन्यानंतर राशिद खान दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला पाठीची दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. हा अफगाणिस्तान संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राशिद 7 जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
राशिद खान (Rashid Khan) याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राहिला होता. याव्यतिरिक्त त्याच्या बॅटमधून अनेक महत्त्वाच्या खेळीही निघाल्या होत्या. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यात राशिदचे मोलाचे योगदान राहिले होते. मात्र, त्याच्या संघाला अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 5 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राशिदला आयपीएलनंतर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भाग घ्यायचा होता, पण दुखापतीमुळे तो आता पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे.
‘राशिद खानला पाठीची दुखापत’
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करत राशिदच्या दुखापतीविषयी माहिती दिली. निवेदनात त्यांनी सांगितले की, “अफगाणिस्तानचा दिग्गज गोलंदाज राशिद खानला पाठीची दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात खेळू शकणार नाही. संघाच्या फिजिओंच्या रिपोर्टनुसार त्याची दुखापत पाहता, तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहील. त्याला 7 जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या वनडेपर्यंत पुनरागमनाची आशा आहे.”
राशिदची आयपीएलमधील कामगिरी
राशिद खान याने आयपीएल 2023 हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून सर्वांना हैराण केले होते. त्याने अवघ्या 32 चेंडूत 3 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 79 धावांची वादळी खेळी साकारली होती. त्यापूर्वी त्याने गोलंदाजी करतानाही 4 विकेट्स घेतल्या होत्या. राशिदने हंगामात 17 सामने खेळताना 32.50च्या सरासरीने 130 धावा केल्या. तसेच, गोलंदाजी करताना 17 सामन्यात 8.23च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट्सही चटकावल्या. अशात, निश्चितच तो संघाबाहेर असल्यामुळे अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. (cricketer rashid khan ruled out from first two odi against sri lanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय कॅच आहे! पठ्ठ्याने चित्त्याची चपळाई दाखवत एका हाताने पकडला अफलातून झेल, सतत पाहिला जातोय व्हिडिओ
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल