---Advertisement---

टी20त घडला इतिहास! भारतीय मूळ असलेल्या ‘या’ धुरंधराने 49 चेंडूत ठोकल्या 144 धावा, टोटल होती 324

On: बुधवार, मे 24, 2023 6:05 PM
Ravi-Bopara
---Advertisement---

एकीकडे भारतात इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे, तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये सध्या टी20 वायटॅलिटी ब्लास्ट स्पर्धाही खेळली जात आहे. या स्पर्धेत ससेक्स संघाकडून खेळताना भारतीय मूळ असलेला खेळाडू रवी बोपारा याने इतिहास घडवला. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. इंग्लंड संघाचा माजी अष्टपैलू रवी बोपारा याने असे काही केले आहे, ज्यामुळे आता सर्वांच्या तोंडी त्याचे नाव आहे. चला तर त्याने नेमकं काय केलंय जाणून घेऊयात…

फक्त 49 चेंडूत 144 धावा
मंगळवारी (दि. 23 मे) टी20 वायटॅलिटी ब्लास्ट (T20 Vitality Blast) स्पर्धेत ससेक्स विरुद्ध मिडलसेक्स (Sussex vs Middlesex) संघ आमने-सामने होते. यावेळी रवी बोपारा (Ravi Bopara) याने ससेक्स संघाकडून खेळताना विक्रम रचला. त्याने मिडलसेक्स संघाच्या गोलंदाजांच्या बत्त्या गुल करत अवघ्या 49 चेंडूत 144 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 12 षटकार आणि 14 चौकारांचाही पाऊस पाडला.

ससेक्सच्या 324 धावा
बोपाराच्या या खेळीच्या जोरावर ससेक्स संघाने मिडलसेक्सविरुद्ध 20 षटकात 7 विकेट्स गमावत तब्बल 324 धावा चोपल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मिडलसेक्स संघाने 15 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 130 धावाच केल्या. त्यामुले हा सामना ससेक्स संघाने 194 धावांनी जिंकला. असे असले, तरीही सामन्यानंतर बोपाराने वाहवा मिळवली. त्याने 293.87च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या.

https://twitter.com/VitalityBlast/status/1661002129799036928

बोपाराने एका षटकात चोपल्या 38 धावा
एवढंच नाही, तर बोपाराने या खेळीदरम्यान एका षटकात 38 धावाही चोपल्या. या धावा डी केयर्स याच्या 15व्या षटकात आल्या. यावेळी ससेक्स संघ 3 बाद 225 धावांवर खेळत होता. बोपाराने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि पुढील दोन्ही चेंडूवर सलग दोन षटकार मारले. मात्र, चौथा चेंडू नो-बॉल ठरला आणि बाय म्हणून चार धावाही मिळाल्या. यानंतर बोपाराने षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर षटकात 38 धावा चोपल्या.

https://twitter.com/FlashCric/status/1661018374011506690?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1661018374011506690%7Ctwgr%5E5113b6cc4132e3419c9363745eeadc19c8baf213%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fravi-bopara-played-blistering-inning-of-144-video-gets-viral-on-social-media%2F

यानंतर पुढच्याच षटकात बोपाराने त्याचे शतक साकारले. या धमाकेदार शतकाचे संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींनी कौतुक केले. शेवटी बोपारा मॅक्स हॅरिस याच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. बोपाराव्यतिरिक्त ससेक्ससाठी टॉम अलसॉप (55) हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या सामन्यातील विजयानंतर ससेक्स संघ शुक्रवारी (दि. 26 मे) समरसेटविरुद्ध टी20 वायटॅलिटी ब्लास्टचा पहिला सामना खेळेल. (cricketer ravi bopara scored one over 38 runs sussex scored 324 runs in t20 match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Eliminator मॅचपूर्वी भज्जीने ठोकला दावा; म्हणाला, Mumbai Indians साठी ‘हा’ पठ्ठ्या ठरणार ट्रम्प कार्ड
‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---