इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपताच क्रिकेटप्रेमींचे लक्ष एका मोठ्या सामन्याकडे लागणार आहे. तो सामना म्हणजेच जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होय. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना 7 ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग याने मोठा दावा केला आहे. तो म्हणाला आहे की, हा सामना दोन्ही संघांना आणखी जवळ घेऊन येईल, पण या मैदानावरील परिस्थिती भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला जास्त फायदेशीर ठरेल.
काय म्हणाला पाँटिंग?
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना आयसीसीच्या 4 ट्रॉफी जिंकणारा रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचे (WTC Final) विश्लेषण केले. तो म्हणाला की, “माझ्या मते, येथील खेळपट्टी ही जवळपास ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीसारखीच आहे. त्यामुळे मी भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला जास्त फायदा देत आहे. जर हा सामना भारतात असता, तर मी म्हणालो असतो की, ऑस्ट्रेलियाला जिंकणे खूपच कठीण होईल. जर हा सामना ऑस्ट्रेलियात असता, तर मी म्हणालो असतो की, ऑस्ट्रेलिया वरचढ आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. कदाचित याद्वारे दोन्ही संघांना आणखी जवळ आणले जाऊ शकते.”
पुढे बोलताना पाँटिंग म्हणाला की, तो एक शानदार ऑस्ट्रेलियन भेदक गोलंदाजी आणि भारताच्या वरच्या फळीतील खेळाडूंमध्ये होणारा सामना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. पाँटिंगने भारताच्या परदेशातील विजयाच्या कारणाचाही उल्लेख केला. तो म्हणाला की, “एक गोष्ट जी भारताने 1990च्या अखेरीस किंवा मग 2000च्या सुरुवातीदरम्यान बदलली आहे, ती आहे भारताची क्षमता. हा संघ भारताबाहेर सामना करण्याची क्षमता राखण्यास सक्षम ठरला आहे. होय, त्यांच्या फलंदाजी कौशल्यात सुधारणा झाली आहे. मात्र, हेदेखील तथ्य आहे की, त्यांनी या 10-15 वर्षांदरम्यान खूप चांगल्या वेगवान गोलंदाजांना घडवले आहे, ज्यामुळे त्यांना परदेशात यश मिळाले आहे.”
डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळण्याची भारताची दुसरी वेळ
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना (World Test Championship Final 2023) 7 ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. डब्ल्यूटीसी (WTC) अंतिम सामना खेळण्याची भारतीय संघाची दुसरी वेळ असेल. यापूर्वी भारताने 2021मध्येही डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती. मात्र, न्यूझीलंडच्या हातून भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. (cricketer ricky ponting says australia have upper hand in wtc final against team india due to condition)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफचे स्वप्न भंगताच कॅप्टन धवनने ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, ‘चूक केली…’
बटलरच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम, संपूर्ण हंगामातच ठरला ‘झिरो’